Malegaon bahya Exit Poll : दादा भुसे गड राखणार की हिरे पुन्हा वर्चस्व मिळवणार? VIDEO

Saam Exit Poll : मालेगाव बाह्य मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई झाली आहे. दादा भुसे गड शाबूत राखणार की, अद्वय हिरे आपलं वर्चस्व पुन्हा मिळवणार? एक्झिट पोलचा अंदाज...
malegaon bahya vidhan sabha
malegaon bahya vidhan sabha saam tv
Published On

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच झाली. प्रचारात या दोघांनी राळ उडवून दिली होती. पण काही ठिकाणी थेट दोन्ही शिवसेना आमनेसामने आहेत. मालेगाव बाह्यमध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत पाहायला मिळाली.

ठाकरे गटाकडून अद्वय हिरे आणि शिंदे गटाकडून दादा भुसे रिंगणात होते. दादा भुसे हे मागील चार टर्म आमदार आहेत. त्याआधी या मतदारसंघात हिरे घराण्याचं वर्चस्व होतं. ते दोन दशकांपूर्वी दादा भुसेंनी मोडून काढलं आणि या मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले. ते आताही विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे दादा भुसे आपला गड राखणार का की हिरे आपलं वर्चस्व पुन्हा मिळवून देणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

तत्पूर्वी, सकाळ माध्यम समूहाच्या साम टीव्हीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये सध्यातरी दादा भुसेंना मतदारांनी कौल दिल्याचं दिसून येतं. ते येथून निवडून येतील असा अंदाज आहे. ते संभाव्य आमदार असू शकतात. अद्वय हिरेंनी दादा भुसेंना सॉलिड आव्हान दिलं.

मालेगाव बाह्य मतदारसंघात यंदा मोठी चुरस बघायला मिळाली. गेल्या चार वेळेला येथून दादा भुसे हे निवडून आले. मंत्रिपदही भूषवलं. सध्या ते पालकमंत्री आहेत. या मतदारसंघात आधीपासूनच हिरे घराण्याचं वर्चस्व होते. २००४ साली दादा भुसे यांनी हे वर्चस्व मोडून काढलं. त्यावेळी दादा भुसे निवडून आले. आतापर्यंत त्यांनी आपलं वर्चस्व राखलंय. सलग चार वेळा आमदार म्हणून कार्यरत आहेत. या निवडणुकीत तिरंगी लढत बघायला मिळाली.

malegaon bahya vidhan sabha
Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

शिंदे गटाकडून दादा भुसे, ठाकरे गटाचे अद्वय हिरे रिंगणात आहेत. बंडुकाका बच्छाव हे अपक्ष उमेदवार आहेत. ही तिरंगी लढत झाली. दोन्ही गटाकडून प्रचारात जबरदस्त तोफा धडाडल्या. लाडकी बहीण योजनेचा या निवडणुकीत दादा भुसेंना फायदा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्याचे चित्र आणि एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे हे संभाव्य आमदार असू शकतात. नेमके आणि स्पष्ट चित्र निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजेच २३ नोव्हेंबरलाच समोर येईल. हे एक्झिट पोलचे प्राथमिक अंदाज आहेत.

malegaon bahya vidhan sabha
Maharashtra Exit Poll: कर्जत खालापूर मतदारसंघातून सुधाकर घारे होणार आमदार? पाहा Exit Poll

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com