Nagpur Pepar Leak: १२ वीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, निवृत्त उपप्राचार्यानेच फोडला पेपर

Umred Paper Leak Case: उमरखेड बारावीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर कुणी फोडला याची माहिती समोर आलली आहे. निवृत्त उपप्राचार्यानेच पेपर फोडला.
Nagpur Pepar Leak: १२ वीच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, निवृत्त उपप्राचार्यानेच फोडला पेपर
Nagpur Pepar Leak Case Saam Tv
Published On

Summary -

  • नागपूरच्या उमरेड येथे बारावीच्या रसायनशास्त्र पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा

  • निवृत्त उपप्राचार्य प्रा. सतीश खर्चे हे २०२३-२४ मध्ये बोर्डाचे पेपरसेटर होते

  • २५ जानेवारीला कोचिंग क्लासमध्ये घेतलेला सराव पेपर आणि बोर्डाचा पेपर एकच असल्याचे समोर आले

  • या प्रकरणी दोन आरोपींना अटक

नागपुरच्या उमरेड पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. टार्गेट कोचिंग क्लासेसचे अतुल चौधरी आणि निवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे यांच्या अटकेनंतर पेपरफुटीचे धागेदोरे थेट बोर्डाच्या पेपर सेटिंगपर्यंत पोहोचले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सतीश खर्चे हे २०२३-२४ मध्ये बोर्डाचे पेपरसेटर होते. त्यांनी तयार केलेला संच २०२६ च्या बोर्ड परीक्षेत आल्याचे तपासात समोर आलंय. याच पेपरचा सरावपेपर 25 जानेवारीलाच कोचिंग क्लासमध्ये घेण्यात आला होता. या प्रकरणामुळे बोर्डाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

उमरेड पेपरफुटी प्रकरणात टार्गेट कोचिंग क्लासेचसे अतुल चौधरी आणि निवृत्त उपप्राचार्य प्रा. सतीश खर्चे यांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२३ बोर्ड पेपर सेंटर म्हणून सेट केलेला बहुतांश प्रश्न आणि २०२६ च्या रसायनशास्त्र बोर्डच्या पेपरमध्येही उतरल्याची चौकशीत समोर आले आहे. ‘टार्गेट अकॅडमी ऑफ सायन्स’ कोचिंग क्लासमध्ये २५ जानेवारीला सराव परीक्षेमध्ये रसायनशास्त्राचा जो पेपर देण्यात आला होता तोच पेपर १८ फेब्रुवारीला बोर्डाचा पेपर असल्याचे तपासातून उघड झाले.

प्राध्यापक सतीश खर्चे हे २०२३-२४ मध्ये बोर्डाचे पेपरसेटर होते. त्यावेळी त्यांनी रसायन शास्त्राचा पेपर बोर्डला दिला होता. त्यामुळे तोच पेपर यावर्षी बोर्डला उतरला आणि टार्गेट कोचिंग क्लासेसला सराव परीक्षेतही तोच पेपर घेण्यात आल्याचे प्राथमिक तपासातून उघड. झाले. बोर्डचा नियमाचा आणि गोपनियेतेचा भंग झाल्याचे तपासातून प्रथमदर्शनी आलं निदर्शनास आले आहे. टार्गेट कोचिंग क्लासेसमध्ये २५ जानेवारी २०२६ ला विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली होती. दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उमरेड पोलिसांकडून पेपरफुटी आणखी काही धागेदोरे आहे का याचा तपास सुरू?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com