बोर्डाची लक्तरं वेशीला, घरी बसून सोडवला दहावीचा पेपर

Major Exam Scam In Maharashtra: नागपूरला बारावीचे दोन पेपर फुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच अमरावतीत दहावीचे दोन पेपर विद्यार्थ्यांनी चक्क घरी सोडवलेत.याप्रकरणी काय कारवाई झाली आहे ? बोर्डाच्या कारभाराचा कसा फज्जा उडाला आहे?
Shocking exam malpractice in Amravati as students allegedly took SSC board papers home and solved them before submission
Shocking exam malpractice in Amravati as students allegedly took SSC board papers home and solved them before submissionSaam Tv
Published On

बारावीचे दोन पेपर फुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच अमरावतीमध्ये राज्यात खळबळ उडवणारी घटना घडलीय. इथे विद्यार्थांनी थेट घरी बसूनच पेपर लिहिले...काय केलं या विद्यार्थांनी पाहूया.. अंजनगाव सुर्जीमध्ये 10वीचा उर्दु आणि इंग्रजीचा पेपर चोरीला गेला. त्याची चौकशी केली असता विद्यार्थी हे पेपर घरी घेऊन गेले..त्यांनी ते पेपर घऱात बसून सोडवलेत.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

या गंभीर प्रकरणातील मुख्य आरोपी गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे याला तात्काळ निलंबित करण्यात आलं तर विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर आणि एक पालक फरार आहे. दुसरीकडे चार विद्यार्थ्यांसह दोन पालकांचीही पोलिस चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे पालक प्रतिष्ठीत राजकीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आलीये. या विद्यार्थ्यांकडे पेपर कसा पोहोचला आणि त्यात कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत का? याचा पोलीस शोध घेत आहेत.

एकीकडे बोर्डाचे पेपर फुटत असताना दुसरीकडे मराठवाडा, विदर्भात कॉप्यांचा सुळसुळाट पहायला मिळतोय. बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगावमध्ये दहावीच्या हिंदीच्या पेपरला चक्क झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे CCTV फुटेज बंद करून शिक्षकांनीच उत्तरपत्रिका तयार करुन विद्यार्थ्यांना दिली. दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात १० वी आणि१२ वीच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांबाबत 22 जणांना निलंबित करण्यात आलय राज्यात गैरप्रकार आढळलेली 107 परीक्षा केंद्रे तातडीने बंद करण्यात आलीत. मात्र एवढं करूनही दरवेळेस कॉपी करण्याच्या नवनवे फंडे समोर येत आहेत

आणि यावर नियंत्रण मिळवण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे.कारण यंत्रणेत अधिकारीच यात सामील आहेत. कुंपणच जर शेत खात असेल तर मग या बोर्डाच्या परीक्षांच महत्नच राहणार नाही...यात नुकसान होतंय ते मात्र होतकरू विद्यार्थ्याच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com