विदर्भात काँग्रेसला भगदाड! बड्या नेत्यासह 600 कार्यकर्त्यांनी हाती घेतलं कमळ

Congress party workers join BJP in Washim Risod taluka: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का! युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन इप्पर यांच्यासह ६०० कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
Youth Congress Maharashtra State Secretary Sachin Ippar and around 600 workers officially join BJP in the presence of Minister Chandrashekhar Bawankule in Nagpur.
Youth Congress Maharashtra State Secretary Sachin Ippar and around 600 workers officially join BJP in the presence of Minister Chandrashekhar Bawankule in Nagpur.saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून सुमारे 600 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केला. महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा नागपूर येथे पार पडला. रिसोड येथील युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सचिन इप्पर यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला धक्का दिला. त्यांच्या सोबत रिसोड तालुक्यातील अनेक सरपंच, माजी सरपंच, सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला.

या पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करत भाजप संघटन अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून हा पक्षप्रवेश झाल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.

Youth Congress Maharashtra State Secretary Sachin Ippar and around 600 workers officially join BJP in the presence of Minister Chandrashekhar Bawankule in Nagpur.
VIRAL VIDEO : डोळ्यांदेखत मगरीनं त्या मुलाला नदीत खेचलं अन्...काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल, बघून हादराल!

उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवाजीनगर मतदार संघातून विभाग प्रमुख राहिलेले आणि नुकतीच पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्षाकडून लढवलेले प्रवीण डोंगरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तसेच रस्त्यावरच्या लढाईमध्ये तसंच अनेक आंदोलनात ते शिवसेनेकडून सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.

Youth Congress Maharashtra State Secretary Sachin Ippar and around 600 workers officially join BJP in the presence of Minister Chandrashekhar Bawankule in Nagpur.
Pune BJP : उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का, विश्वासू शिलेदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रविण डोंगरे म्हणाले, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्यातील नेतृत्व मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विकासाभिमुख कामांमुळे प्रेरित होऊन मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे असे प्रवीण डोंगरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com