Shani shingnapur : अशुद्ध तेलानं शनि शिळेची झिज? देवस्थानने घेतला भुवया उंचावणारा निर्णय, VIDEO

Shani shingnapur Latest Update : शनिशिंगणापूरच्या देवस्थानसंदर्भात मोठी बातमी....शनिशिंगणापूरच्या शनि देवाला आता फक्त ब्रँडेड तेलानेच अभिषेक करण्यात येणार आहे. हा निर्णय का घेतलाय? आणि कधीपासून याची अंमलबजावणी होणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट...
Shani shingnapur : अशुद्ध तेलानं शनि शिळेची झिज? देवस्थानने घेतला भुवया उंचावणारा निर्णय, VIDEO
Published On

महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भाविक शनिदेवाच्या दर्शनासाठी येतात. शनि देवाचा कोप होऊ नये म्हणून येथील शिळेवर तेल वाहण्याची प्रथा आहे. दररोज लाखो भाविक तेल अर्पण करतात. मात्र, अलीकडेच संस्थानाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय..शनि शिंगणापूर येथील शनी देवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा, असा निर्णय़ विश्वस्त मंडळानं घेतलाय.

सुटं आणि मिश्रीत तेल भेसळयुक्त असतं. त्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होऊन शिळेची झिज होत असते, असा अहवाल अन्न आणि भेसळ समितीनं दिलाय. त्यामुळे शुद्ध आणि ब्रँडेड तेलच शनी देवाला वाहण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलाय....

Shani shingnapur : अशुद्ध तेलानं शनि शिळेची झिज? देवस्थानने घेतला भुवया उंचावणारा निर्णय, VIDEO
Zodiac Sign: या दोन राशीच्या लोकांनी हातात बांधू नये लाल धागा, शनिदेव होईल नाराज

ब्रँडेड तेलानेच शनिदेव प्रसन्न?

शनि शिंगणापुरात चौथऱ्यावर तैलाभिषेकाची परंपरा

शनिदेवाला सुट्या तेलाचा अभिषेक चालणार नाही

ब्रँडेड कंपनीचं, शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणं बंधनकारक

तेलातल्या भेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचा दावा

भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास ते स्वीकारलं जाणार नाही

Shani shingnapur : अशुद्ध तेलानं शनि शिळेची झिज? देवस्थानने घेतला भुवया उंचावणारा निर्णय, VIDEO
Madhya Pradesh: चोरीला गेले शनिदेव, परत आले यमराज; पाहा नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, विश्वस समितीनं आणि भाविकांनी याबाबत काय प्रतिक्रीया दिलीये ते पाहूयात....

शनिदेवाच्या शीळेची झिज होऊ नये यासाठी हा निर्णय़ घेतला असला तरी ब्रँडेड आणि शुद्ध तेलाच्या नावाखाली बाजार मांडून भाविकांची लूट होणार नाही याची विश्वस्त आणि देवस्थानानं खबरदारी घेण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com