Madhya Pradesh: चोरीला गेले शनिदेव, परत आले यमराज; पाहा नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भिंडमध्ये एक अजब किस्सा घडला.
Madhya Pradesh
Madhya PradeshSaam Tv
Published On

भोपाल: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भिंडमध्ये एक अजब किस्सा घडला. लहार येथील नवग्रह मंदिरातून शनिदेवाची मूर्ती चोरीला गेली. मात्र, पोलिसांनी शनिदेवा ऐवजी यमराजाची मूर्ती शोधून काढली. या घटनेनंतर मध्य प्रदेश पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत (Madhya Pradesh thief theft the statue of Shanidev Bhind police recover Yamraj statue).

Madhya Pradesh
धक्कादायक : नंदुरबारमध्ये बंद घरातील 80 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी!

मूर्ती चोरीची (Theft) घटना 21 जानेवारीची आहे. लाहार येथील भाटन तालुक्याच्या नवग्रह मंदिरातून काही अज्ञातांनी शनिदेवीची (Shanidev) मूर्ती चोरुन नेली. देवाची मूर्ती चोरीला गेल्याची खबर पोलिसांना देण्यात आली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुजाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीच्या मूर्तीचा शोध सुरु केला. पोलिसांनी (Police) अज्ञातांविरुद्ध चोरीची तक्रार नोंदवून चोरट्यांचा शोध सुरु केला. लहार एसडीओपी अवनीश बन्सल मूर्ती घेऊन शनिदेव मंदिरात पोहोचले. त्यांनी सांगितले की, ही मूर्ती रौण पोलीस स्टेशन हद्दीतील मणी जेटपुरा गावाजवळील एका शेतातून सापडली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही तीच मूर्ती आहे जी नवग्रह मंदिरातून चोरीला गेली होती.

Madhya Pradesh
हिऱ्यांची मोठी चोरी! म्यानमारच्या व्यापाऱ्याचे 5 कोटींचे हिरे चोरले, टोळीचा पर्दाफाश

चोरीला गेले शनिदेव परत आले यमराज

मंदिराच्या पुजाऱ्याने मूर्ती पाहताच नकार दिला. ही चोरी झालेली शनिदेवाची मूर्ती नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी आणलेली मूर्ती पाहताच भाविकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलीस जी मूर्ती घेऊन पोहोचले होते, ती प्रत्यक्षात शनिदेवांची नव्हती. वास्तविक पोलिसांनी जप्त केलेली मूर्ती यमराजाची होती. आता मंदिरातील पुजारी आणि भाविक ही मूर्ती मंदिरात स्थापित करण्यास तयार नाहीत. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर अधिकारी याप्रकरणी काहीही बोलण्याचे टाळत आहेत.

पुजाऱ्याने मूर्ती बसवण्यास नकार दिला

मूर्ती चोरीची ही घटना भिंड येथील आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे पोलीस शनिदेवांऐवजी यमराजाची मूर्ती घेऊन पोहोचले होते. ही तीच मूर्ती असल्याचे पोलिसांनी सांगितले, जी मंदिरातून चोरीला गेली होती. मात्र, पुजाऱ्याने सांगितले की ती शनिदेवाची नही तर यमराजाची मूर्ती आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com