Nagpur Clash : नागपुरात मोठा राडा; २ गटातील वादानंतर दगडफेक अन् जाळपोळ; घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा

Nagpur Clash News : नागपुरात मोठा राडा झाला आहे. नागपुरातील महलमध्ये २ गटातील वादानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाली आहे.
Nagpur Clash update
Nagpur ClashSaam tv
Published On

नागपुरातून मोठी बातमी समोर आली आहे. नागपूरच्या महल परिसरात दोन गटातील वादानंतर दगडफेकीची घटना घडली. दोन गटात दगडफेक झाल्यानंतर वाहनांची जाळपोळ झाली. या घटना घडल्यानंतर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या महल परिसरात दोन गटात मोठा राडा झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. काहींनी वाहनांची जाळपोळ देखील केली. दोन्ही गटात दगडफेक झाल्यानंतर परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. या दगडफेकीत पोलीस देखील जखमी झाले आहेत.

Nagpur Clash update
Electricity Outage : वीजबिल थकलं काही घरांचं, पण वीजपुरवठा बंद केला अख्ख्या गावाचा; महावितरणचा अजब कारभार

वाहनांची जाळपोळ

दोन गटात वाद झाल्यानंतर काहींनी वाहनांची जाळपोळ केली. महल परिसरातील दोन वाहने जाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जेसीबी आणि एक लहान वाहन अशी दोन वाहने जाळण्यात आली आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

Nagpur Clash update
Shirdi Airport : थरारक! विमानतळावर बिबट्यांचा वावर; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धडकी भरवणारा VIDEO समोर
Nagpur Clash update
Bharati Pawar Passed away : भारती पवार यांचं निधन, सामाजिक क्षेत्रात हळहळ; पुण्यात उद्या अंत्यसंस्कार

शांतंतेचं आवाहन

नागपुरातील घटनेनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. 'नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्देवी आहे. नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com