Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; धाराशिवातील बड्या नेत्याकडून पदाचा राजीनामा

Maharashtra Political News : धाराशिवात अजित पवार गटातील खदखद समोर आली आहे. अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
ajit pawar News in Marathi
ajit pawar newsSaam tv
Published On

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिव जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्यात हातात असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'निधीचे ग्रहण ' लागलंय. धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना निधी न मिळाल्याने पक्षात खदखद पाहायला मिळत आहे. निधी मिळत नसल्याने धाराशविचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे पदाचा राजीनामा सोपवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच आता 'निधीचे ग्रहण लागलंय. धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेत असूनही निधी मिळत नसल्याने जिल्ह्यातील 62 पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर याच नाराजी पोटी जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

ajit pawar News in Marathi
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे सुसाट, पण राज ठाकरेंचं मौन का? वाचा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

धाराशवितात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार खासदार नाही. त्यामुळे पक्ष वाढीसाठी पक्षश्रेष्ठींनी पाठबळ द्यावे, असा सूर सध्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच धाराशिवच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील हे नाराजी नाट्य समोर आल्याने पक्षश्रेष्ठी यातून कसा मार्ग काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ajit pawar News in Marathi
Sanjay Shirsat : शिरसाटांच्या हातात सिगारेट अन् बेडवर पैशांनी भरलेली बॅग; संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, VIDEO

लातूरमध्ये शरद पवारांना धक्का

लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि प्रहार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लातुरात आज अनेक बड्या नेत्यांनी शरद पवार गट आणि प्रहार पक्षाला रामराम ठोकलाय. आज या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चाकूर तालुक्यातील १५० कार्यकर्त्यांनी आज मुंबई येथे भाजपात प्रवेश केला आहे.

ajit pawar News in Marathi
Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

लातूरच्या चाकूरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि चाकूर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष यांच्यासह १५० कार्यकर्त्यांचा आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर आज चाकूरमधून ७० ते ८० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाले होते. पक्ष प्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांनी म्हटलं की, आपण दाखवलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही. चाकूर परिसरातील प्रलंबित समस्या आगामी काळात देवेंद्र फडणवीस मार्गदर्शनाखाली सोडवण्यात येतील, अशी ग्वाही दिली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com