
शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस आल्याची चर्चा आहे. सत्ताधारी पक्षातील मंत्र्याला आयकर विभागाची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळाळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. शिरसाटांना नोटीस मिळाल्याने सत्ताधाऱ्यांमध्येच गँगवॉर सुरु असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. आयकर विभागाच्या नोटिशीमुळे राजकारण तापलं असताना संजय राऊतांनी एक मोठा दावा केला आहे. एका व्हिडिओमधील व्यक्ती संजय शिरसाट असून ते सिगारेट ओढत आहेत.त्यांच्याजवळ पैशांची बॅग आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका करताना संजय शिरसाटांविषयी मोठा दावा केला आहे. संजय राऊत म्हणाले, 'एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर भविष्यात नक्कीच कारवाई होईल. एक संबंधित मंत्री आहे, त्यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला. त्या व्हिडिओमध्ये मंत्री महोदय पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत. या बॅगेत नोटांचे बंडल आहेत. योग्य वेळ येताच सर्व पुरावे गोळा होत असतात. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होत असते'.
मंत्री संजय शिरसाट आणि खासदार शिंदे यांना ईडीच्या नोटीसच्या वृत्ताचे खंडन केले आहे. शिंदे गटावर टीका करताना राऊत पुढे म्हणाले, 'शिंदेंच्या जवळच्या लोकांवर कारवाई होईल, असा दावा राऊतांनी केलाय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती खास पुरावा लागलाय. दिल्लीतील शिंदे यांच्या पाठिशी असणाऱ्या शक्ती कमकुवत होत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय. सत्तेचं संरक्षण हे तात्पुरते असते. दिल्लीतील संरक्षक कमकुवत झाल्यानंतर तपास यंत्रणा त्यांच्याकडे असणाऱ्या फाईल उघडतात,असंही राऊतांनी म्हटलं.
दरम्यान, संजय राऊत यांच्या दाव्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट म्हणाले, 'मी तो व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, त्यात मी बसलो आहे. बेडरुममध्ये बनियानवर बसलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा आहे. तिथे एक बॅग ठेवलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, मी प्रवासातून आलोय. कपडे काढले. त्यानंतर बेडवर बसलो आहे. एवढे पैसे असेल, तर अलमाऱ्या मेल्या आहेत का? नोटा कपाटात ठेवल्या असत्या. कपड्याची बॅग देखील पैशांची दिसत आहे. खरंतर यांना कपडे ठेवण्यासाठी बॅग लागत नाहीत. तर पैसे ठेवण्यासाठी बॅग लागते. असं त्यांचं वर्तन आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.