राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल; ४ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे बदली?

Maharashtra IAS transfer : राज्याच्या प्रशासनात फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील ४ बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
IAS Transfer
IAS TransferSaam Tv
Published On
Summary

महाराष्ट्राच्या प्रशासनात फेरबदल

एकाच दिवशी ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अनिता मेश्राम यांच्यासह ४ अधिकाऱ्यांची बदली

महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील ४ बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात डॉ. माधवी खोडे-चवरे आणि अनिता मेश्राम यांच्यासहित ४ अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशी सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. दोन आठवड्यापूर्वी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. मुंढे यांच्या बदलीमुळे सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज मंगळवारी महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

IAS Transfer
राज्याच्या प्रशासनात 'बदली' वारे! तुकाराम मुंढेंसह 6 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली बदली?

कोणाची कुठे बदली?

डॉ. माधवी खोडे-चवरे (IAS:RR:2007) अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांची नियुक्ती अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी, मंत्रालय, मुंबईत करण्यात आलीये

सुनील महिंद्रकर (IAS:SCS:2015) यांची नियुक्ती मुंबईत अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक या पदावर करण्यात आली आहे.

IAS Transfer
IAS Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढेंची ४५ दिवसांत पुन्हा बदली; आता कुठे झाली नियुक्ती?

अनिता मेश्राम (IAS:SCS:2015), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांची नियुक्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) आयुक्त म्हणून नागपुरात करण्यात आली आहे.

आदित्य जिवणे (IAS:RR:2021), संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण (MAHADISCOM), छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती जळगाव महानगरपालिका आयुक्त या पदावर करण्यात आलीये

तत्पूर्वी, मागील आठवड्यात देखील ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबईसह पुणे, नाशिक, जळगाव इत्यादी भागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात राहुल रंजन महिवाल, रुचेश जयवंशी, अमित रंजन यांच्यासहित ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज मंगळवारी ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com