संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, २० पैकी मविआला फक्त १ जागेवर विजय, विजेत्या उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Chhatrapati Sambhajinagar District Central Cooperative Bank Polls: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १९ जागांवर विजय मिळवत वर्चस्व प्रस्थापित केले.
Chhatrapati Sambhajinagar District Central Cooperative Bank Polls
sanjana jadhav Chhatrapati Sambhajinagar District Central Cooperative Bank Pollssaam TV marathi
Published On

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election Results: छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीने वर्चस्व मिळवले आहे. महायुतीच्या शेतकरी पॅनलचे 19 सदस्य जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडून आलेले आहेत. जिल्हा बँकेवर 21 संचालक मंडळ आहे. त्यापैकी एका गटात एकच अर्ज आला आणि तोही बाद झाल्यामुळे 20 संचालक मंडळासाठी ही निवडणूक झाली. २० संचालक मंडळाच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर आठ जण बिनविरोध आले होते.

उर्वरित 12 संचालक मंडळासाठी निवडणूक झाली या निवडणुकीत महाविकास आघाडीमधून काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे हे एकमेव विजय झाले तर उर्वरित सर्व महायुतीचे उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे हे महायुतीच्या पॅनलमधून विजयी झाले. २० संचालक मंडळापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर जिल्ह्यातील मंत्री, खासदार आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांचेच वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar District Central Cooperative Bank Polls
Sambhajinagar : संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ३ दिग्गजांचे अर्ज बाद, सत्तारांना धक्का | Video

संचालक मंडळाच्या २० सदस्यांपैकी दोन मंत्री, १ खासदार, ५ आमदार संचालक मंडळावर आहेत. यात खासदार डॉ. कल्याण काळे, पालकमंत्री संजय शिरसाट बिनविरोध, कॅबिनेट मंत्री अतुल सावे विजयी, आमदार रमेश बोरनारे बिनविरोध , आमदार अंबादास दानवे विजयी, आमदार विलास भुमरे बिनविरोध, आमदार अनुराधा चव्हाण विजयी, आमदार रंजना जाधव विजयी झालेल्या आमदार खासदारांचा समावेश आहे. तर उर्वरित सदस्यमध्ये अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार, माजी संचालक नितीन पाटील यांचे पुत्र अर्जुन पाटील, रामुकाका शेळके यांचा समावेश आहे. 'ही शेतकऱ्यांची बँक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकरी पॅनला निवडून दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही काम करू, असं विजयानंतर मंत्री अतुल सावे आणि खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले आहे.'

विजयी उमेदवार

डॉ. कल्याण काळे

आ. संजना जाधव

प्रभाकर काळे

शेषराव जाधव

बिगर शेती मतदार संघातून महायुतीचे सर्व पाच उमेदवार विजयी

अतुल सावे

अंबादास दानवे

रामराव शेळके

अर्जुन पाटील

रवींद्र काळे

Chhatrapati Sambhajinagar District Central Cooperative Bank Polls
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक; एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण रणनीतीपुढे विरोधक फेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com