Vidhan Parishad Election: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला; भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना कोणाला किती मिळाल्या जागा?

Maharashtra Council Elections: प्रदीर्घ वाटाघाटींनंतर, महायुतीने २०२६ च्या विधान परिषद निवडणुकीसाठी आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला आहे. भाजप ११ जागांवर, शिवसेना ४ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवर निवडणूक लढवणार आहे.
Maharashtra Council Elections:
MahaYuti leaders finalize the seat-sharing formula for the 2026 Maharashtra Vidhan Parishad elections after prolonged discussions.
Published On
Summary
  • महायुतीतील जागावाटपाचा दीर्घकाळ सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे.

  • अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार.

  • राज्य व केंद्रातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यात आला.

प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर अखेर १७ जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालंय. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप ११, शिवसेना ४ तर राष्ट्रवादी २ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आले आहे. राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात झाल्या नाहीत. तर या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे, पण निवडणूक झाल्या नाहीत. अशात गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या ७५ टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात.

Maharashtra Council Elections:
मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

त्यानुसार विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या खरं पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडत होत्या. अखेर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना कशा पद्धतीने हा तिढा सुटला? हे जाणून घेऊ.

त्यानुसार विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या खरं पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून मोठ्या घडामोडी घडत होत्या. अखेर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना कशा पद्धतीने हा तिढा सुटला? हे जाणून घेऊ.

Maharashtra Council Elections:
भाजपच्या दिग्गज नेत्याची हत्या; कारण ठरलं सिगारेट, राजकारणात खळबळ

त्यात शिवसेनेने आपली ताकद असलेल्या आणि पारंपारिक जागा असलेल्या सहा जागांवर दावा केला. मात्र अंतिम चर्चेमध्ये सहापैकी चारच जागांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले. त्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू झाला. या जागांवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा दावा ठोकण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी रायगड पालकमंत्री पद शिवसेनेला आणि विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला अशा प्रकारचा प्रस्तावावर चर्चा करून अंतिम तोडगा काढण्यात आला.

नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर- जालनामधील वाद

नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर- जालना या दोन जागांपैकी एक जागा भाजपला हवी होती. पण या दोन्ही जागा शिवसेनेच्या पारंपारिक जागा असल्याने या जागा सोडण्यात शिवसेनेने तयार नव्हती. मात्र अंतिम चर्चेवेळी नाशिकची जागा शिवसेना पक्षाला आणि छत्रपती संभाजीनगर जालन्याची जागा भाजपला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

परभणी हिंगोली, पुण्यातील जागेचा वाद

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे त्यासोबतच परभणी हिंगोली या दोन विधान परिषदेच्या जागेवर आकडेवारीनुसार वर्चस्व आहे. त्यामुळे परभणी हिंगोली, पुणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात यासाठी पक्ष आग्रही होता. पुण्याच्या जागे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणाऱ्या दोन जागांमध्ये पुण्याची जागा त्यासोबतच कोकणामधील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात पडली. तर परभणी आणि हिंगोलीची जागा शिवसेनेकडे गेली आहे. त्यामुळे भाजप ११ जागांवर, शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २ जागांवरून निवडणूक लढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com