शिक्षक मतदारसंघानंतर पदवीधर निवडणुकीतही महायुतीत ठिणगी? स्मिता जाधवांच्या सातारा दौऱ्यात नेमकं काय घडलं? चर्चांना उधाण

Maharashtra Politics: साताऱ्यात महायुतीतील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या दौऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांची भेट झाली नाहीये.
Maharashtra Politics:
Smita Jadhav Satara visit and Shambhuraj Desai meeting controversysaam tv
Published On: 

ओंकार कदम, साम प्रतिनिधी

साताऱ्यात महायुतीमध्ये धुसफुस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरून घटकपक्षात बिनसलंय. सातऱ्यात स्मिता जाधव यांनी शिवसेनेचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेणं टाळलंय. यामुळे महायुतीत शिक्षक मतदारसंघानंतर पदवी मतदारसंघातही वादाची ठिगणी पडल्याची चर्चा सुरू झालीय.

एकीकडे महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकत्र आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांना विजयी करण्यासाठी सर्व घटक पक्ष एकत्रितपणे काम करणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई देत असलेले तरी भाजपचे उमेदवार असलेल्या स्मिता जाधव यांना मात्र त्याचा विश्वास नसल्याचं दिसतंय.

Maharashtra Politics:
भाजपविरोधात बंडखोराला शिंदेसेनेचा पाठिंबा? पुणे शिक्षक मतदारसंघात चुरस वाढणार

त्याच कारण ठरलंय, स्मिता जाधव यांचा सातारा दौरा. महायुतीच्या उमेदवार डॉ.स्मिता जाधव सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात सातारा शहर, रहिमतपूर, कराड आणि पाटण येथे मेळावे होणार असून, महायुतीच्या नेत्यांसह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांशी त्या संवाद साधणार आहेत.

Maharashtra Politics:
पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत मंत्री शंभुराज देसाई यांच्या भेट घेणार असल्याचं नमूद करण्यात आलंय. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी भेट घेणं टाळलं. पुण्यात शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेने आपला पाठिंबा दर्शवलाय. शिवसेनेच्या चालीमुळे भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. या वादाचा दुसरा भाग पदवीधर मतदारसंघात दिसून येत आहे.

असा असणार स्मिता जाधव यांचा दौरा

दरम्यान स्मिता जाधव या सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याशीही त्या संवाद साधतली. तसेच जनता बँक येथेही त्या भेट देणार आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या निवासस्थानी त्या भेट देणार आहेत. सावकार कॉलेज आणि यशोदा शिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.

दुपारी २ वाजता कराड दक्षिणमधील ढेबेवाडी रस्त्यावरील ओम हॉल येथे, तर दुपारी ३ वाजता कृष्णा हॉस्पिटल परिसरातील बॅडमिंटन हॉल येथे मेळावे होणार आहेत. या मेळाव्याला भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com