महायुतीत बिघाडी! माजी मंत्री अन् राष्ट्रवादीच्या आमदारात जुंपली; आरोप-प्रत्यारोपानं मवाळमधील राजकारण तापलं

Mahayuti Clash : विकासकामे आणि निधीवरून मावळमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आलेत. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.
Mahayuti Rift In Maval: Sunil Shelke And Bala Bhegde Clash Over Development Funds
Mahayuti Rift In Maval: Sunil Shelke And Bala Bhegde Clash Over Development Funds
Published On: 
Summary
  • मावळमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.

  • राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक युद्ध

  • भाजपला अधिकचा निधी दिला जात असल्याचा आरोप

दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी

महायुतीमधील नेत्यांमध्ये विकासकामे आणि निधीवरून खटके उडू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेतील नेते एकमेकांवर आरोप करू लागलेत. भाजपच्या नेत्यांना अधिकचा निधी दिला जातो, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. आता राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्रीमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. आमदार शेळकेंच्या टीकेला माजी मंत्री बाळ भेगडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळकेंनी भाजप नेत्यांसाठी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. शेळकेंच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज वडगाव मावळ येथे भाजपकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. या वक्तव्याचा निषेध करत मावळ तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, या निषेध मोर्चातून भाजप कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Mahayuti Rift In Maval: Sunil Shelke And Bala Bhegde Clash Over Development Funds
Sunetra Pawar: एकदा पक्षाबाहेर पडलात तर कायमचे बाहेर व्हाल! सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

जे नेते म्हणतात की, भाजपचे कार्यकर्ते कामे करू देत नाही तेच आमदार आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उड्या मारतात, असा टोला माजी मंत्र्यांनी आमदार शेळकेंना लगावलाय. बाळा भेगडे आणि सुनिल शेळकेंच्या शाब्दिक युद्धामुळे मावळमधील राजकारण तापलंय. जर अशा प्रकारचं राजकारण करत असाल तर मावळमधील आमचे कार्यकर्ते तुम्हाला फिरू देणार नाही असाही इशारा त्यांनी शेळकेंना दिलाय.

Mahayuti Rift In Maval: Sunil Shelke And Bala Bhegde Clash Over Development Funds
राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

पोटोबा महाराज मंदिराचा हा वेगळा ट्रस्ट आहे, त्यांनी 100 एकर जमीन देवस्थानची आहे. त्यातून किती जमीन क्रीडा संकुलासाठी द्यावी, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोर्टासाठी ही जागा कमी पडत आहे असं म्हणणं आमदारांचं आहे. मात्र त्यांनी वनविभागाची जमीन घ्यावी. असं माजी मंत्री बाळा भेगडे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com