Maharashtra Lok Sabha Election 2024: मोठी बातमी! महाविकास आघाडीच्या जळगाव, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला; उमेदवार कोण?

About Mahavikas Aaghadi Jalgaon, Kolhapur Lok Sabha Candidate: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाला सोडणार असून त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत होत आहे.
About Mahavikas Aaghadi Jalgaon, Kolhapur Lok Sabha Candidate | Saam Tv Marathi News
About Mahavikas Aaghadi Jalgaon, Kolhapur Lok Sabha Candidate | Saam Tv Marathi NewsSaam Tv
Published On

गिरीश कांबळे, मुंबई|ता. ५ फेब्रुवारी २०२४

Jalgaon, Kolhapur Lok Sabha Consistency

महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये जळगाव आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला असून आता रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये चुरस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. उद्याच्या महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aaghadi) जळगाव आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

याआधी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा ही जागा लढवण्यासाठी आग्रही होती. मात्र आता जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हर्षल माने शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार असतील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

About Mahavikas Aaghadi Jalgaon, Kolhapur Lok Sabha Candidate | Saam Tv Marathi News
Police Bharti 2024: तरुणांसाठी खूशखबर! पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज?

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाला सोडणार असून त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत होत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती (Chhatrapati Shahu Maharaj) हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत.

शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात. तर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) हे संभाव्य उमेदवार असतील. दरम्यान, महाविकास आघाडीची रामटेक आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ कोणता पक्ष लढवणार यावर अजूनही चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

About Mahavikas Aaghadi Jalgaon, Kolhapur Lok Sabha Candidate | Saam Tv Marathi News
Dharashiv Crime News : धाराशिव पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील एकासह सात जण अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com