चीनमध्ये टक्कल पडण्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत चीनला केसांची तस्करी (Hair Smuggling) केली जात असल्याचं एक मोठं रॅकेट समोर आलं आहे. आतापर्यंत आपण सोनं, चांदी आणि हिऱ्याची तस्करी ऐकली आहे. आता चक्क केसांची तस्करी करणारं एक मोठं रॅकेट समोर आलं आहे. (Latest Crime News)
ईडीने 11 हजार 793 कोटी रुपयांच्या मानवी केसांच्या तस्करीचं रॅकेट प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. हे तीन पॉइंट कॉरिडॉरद्वारे सुरू असलेलं एक कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
केसांच्या तस्करीचं प्रकरण
म्यानमारमधील व्यापाऱ्यांकडून पैसा हैदराबादला कसा पाठवला जातो, याचा खुलासा झाला आहे. ही रक्कम अनेक खात्यांमधून जमा केली जात असल्याचं समोर आलं (Hair Smuggling Racket) आहे. एकूण 11 हजार 793 कोटी रुपयांपैकी सुमारे 2,491 कोटी रुपये रोख स्वरूपात (21% पेक्षा जास्त) अशा खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. याप्रकरणी ईडीने फेब्रुवारी 2022 मध्ये देशभरात शोध घेतला. म्यानमारमधून केस निर्यात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार ED ने मोडस ऑपरेंडीचा पर्दाफाश केल्यानंतर कारवाई केली. 2021 मध्ये हैद्राबाद स्थित नायला फॅमिली एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध बेनामी आयात निर्यात कोड (IEC), तोतयागिरी आणि खोटेपणा केल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात (ED Action On Hair Smuggling) आला आहे. हैदराबाद विमानतळावरून म्यानमार, बांगलादेश, व्हिएतनाम आणि चीनमध्ये केसांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे.
अनेक बेनामी संस्था
या कंपनीने कमी दरात केसांची निर्यात करण्यासाठी अनेक बेनामी संस्था तयार केल्याचं सांगितलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाला मिळालेल्या माहितीनुसार उपलब्ध कागदपत्रांवरून असं दिसून आलं आहे की, जेव्हा या संस्था कर अधिकाऱ्यांसोबत अडचणीत (crime news) येतात. तेव्हा त्या बरखास्त केल्या जातात आणि नवीन IEC तयार केले जातात.
वार्षिक ८ हजार रूपयांची उलाढाल असल्याची माहिती माध्यमांच्या हवाल्याने मिळत आहे. चीनकडून हैदराबाद-मिझोरम-म्यानमारला अवैध दारूगोळा केला जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.