Onion Rate: केंद्राने निर्यात बंदी उठवताच कांद्याचे दर झपाट्याने वाढले; प्रतिक्विंटल मिळतोय इतका भाव

Onion Rate Today: केंद्राने निर्यात बंदी उठवताच कांद्याचे दर झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
onion rate today maharashtra
onion rate today maharashtraSaam TV
Published On

Onion Price Today in Nashik

केंद्रातील मोदी सरकारने रविवारी (१८ फेब्रुवारी) कांद्यावरील निर्यात बंदी हटवून देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, निर्यात बंदी उठवताच कांद्याचे दर झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

onion rate today maharashtra
Weather Alert: देशातील ७ राज्यांमध्ये अवकाळी पाऊस अन् गारपीटीची शक्यता; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा...

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात सोमवारी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. रविवारच्या तुलनेत आज सोमवारी बाजारसमितीत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ६६१ रुपयांनी वाढले. त्यामुळे कांद्याला २ हजार १०० रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. (Latest Marathi News)

सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ३०० वाहनातून कांद्याची आवक होत आहे. कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल २ हजार १०१ आणि कमीतकमी १ हजार रुपये इतका भाव मिळत आहे. कांद्याचा भाव सरासरी १ हजार ८०० रुपये असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं जरी कांदा निर्यातील परवानगी दिली असली तरी, त्यावर मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने आता कुठल्याही अटी शर्थी न ठेवता कांद्यावरील संपूर्ण निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्यामुळे सरकार कांद्याबाबत पुढे कोणता निर्णय घेतं? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

८ डिसेंबरला घातली होती निर्यात बंदी

८ डिसेंबर २०२३ रोजी केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निराश करणारा निर्णय घेतला होता. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. स्थानिक बाजारपेठांतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात होतं.

त्यानुसार, ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आलं होतं. याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. सरकारच्या या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी आंदोलनं सुरु केली होती.

onion rate today maharashtra
Breaking News: महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत; शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये करणार प्रवेश?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com