Weather Update : राज्यात अतिमुसळधार पावसासह नवं संकट; कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

IMD Weather Update : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आयएमडीकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Update Vidarbha Marathwada Weather Update
Maharashtra Weather Update Vidarbha Marathwada Weather UpdateSaam Tv News
Published On

देशातील अनेक भागांमध्ये सध्या कडाक्याचं ऊन पडत आहे. तपमानात प्रचंड वाढ झाली आहे. याचदरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील अनेक भागांमध्ये वादळी वारा आणि विजांसह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला असून, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आयएमडीने (IMD) म्हटलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व राजस्थान, पश्चिम आणि पूर्व मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या काळात वाऱ्याचा वेग प्रति तास ५०-६० किमी एवढा राहणार असल्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update Vidarbha Marathwada Weather Update
बायकोने राहत्या घरी आयुष्य संपवलं, नवऱ्याने रेल्वेसमोर उडी घेत मृत्यूला कवटाळलं, दोन्ही पोरं पोरकी; छत्रपती संभाजीनगर हादरलं

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आयएमडीकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून भंडारा, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि वि‍जांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ४०-५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्रसह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, सिक्कम आणि जम्मू -काश्मीरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाऊस पडण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update Vidarbha Marathwada Weather Update
Gulabrao Patil : अजित पवारांना 'त्या' निर्णयाचा पश्चाताप येणार; मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com