Maharashtra Weather : राज्यात मेघगर्जनेसह २ दिवस पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामान विभागानं काय सांगितलं?

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात हवामान विभागाने पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला असून अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
MAHARASHTRA WEATHER UPDATE: IMD ISSUES YELLOW ALERT FOR THUNDERSTORMS AND RAIN
MAHARASHTRA WEATHER UPDATE: IMD ISSUES YELLOW ALERT FOR THUNDERSTORMS AND RAINSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

  • हवामान विभागाकडून काही भागांसाठी येलो अलर्ट जारी

  • राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान ४२ अंशांच्या पुढे

  • कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण

राज्यातील वाढत्या उष्णतेदरम्यान आता हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात सध्या उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाचा चटका आणि वाढलेला उकाडा यामुळे दैनंदिन जीवन त्रस्त झाले असतानाच आता पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: IMD ISSUES YELLOW ALERT FOR THUNDERSTORMS AND RAIN
Crime News : पती दारू पिऊन छळ करायचा, वैतागलेल्या पत्नीने केली हत्या; जळगावातील धक्कादायक घटना

दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला. वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, वाशीम, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तीव्र उष्णतेची नोंद झाली. तसेच सोलापूर, परभणी आणि यवतमाळ येथे तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक होते. महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

MAHARASHTRA WEATHER UPDATE: IMD ISSUES YELLOW ALERT FOR THUNDERSTORMS AND RAIN
Shocking : नातीला पोटमाळ्यावर लपवलं, लैंगिक अत्याचार करताना लोकांनी पाहिलं, नराधम आजोबाला पोलिसात दिलं, पर्वती भागातील घटनेत काय घडलं?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारनंतर राज्यातील हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com