Maharashtra Weather : मुंबई-पुण्यात कडाक्याचे ऊन, पण विदर्भात अवकाळीचा इशारा; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Today Maharashtra Weather News : राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असून उन्हाचा चटका वाढत आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Weather News : राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूच, आज कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामानाचा अंदाज
Maharashtra Today Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • अवकाळी पावसाची उघडीप

  • विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट

  • राज्यात तापमानात हळूहळू वाढ

  • शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान

राज्यात अवकाळी पावसाने विश्रांती घेतली असून उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे. आज पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत सकाळी गारवा आणि दुपारी कडाक्याचं ऊन जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

काल म्हणजेच सोमवारी सोलापूर आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने तापमानात चढ-उतार होत आहे. तसेच किमान तापमानात काही अंशी घट झाल्याने काही ठिकाणी रात्री गारठा जाणवू लागला आहे.

Weather News : राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूच, आज कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामानाचा अंदाज
Crime News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार; सोशल मीडियावर मैत्री करणं पडली महागात

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. राज्यात उकाडाही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Weather News : राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूच, आज कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपून काढणार; वाचा हवामानाचा अंदाज
Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

सतत बदलणार तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट आणले आहे. अनेक जिल्ह्यातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः मका, द्राक्ष या पिकाला मोठा फटका बसला असून शेतात उभे असलेले पीक आडवे पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसाने आणखी संकट ओढवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com