Weather Update: विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका, कोणत्या जिल्ह्यात कसं राहिल हवामान?

Maharashtra Cold Wave Weather Update: राज्यातील तापमानात सतत चढ-उतार होत आहे. आज विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
Weather Update: विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका, कोणत्या जिल्ह्यात कसं राहिल हवामान?
Maharashtra Weather UpdateSaam Tv
Published On: 

राज्यात सध्या तापमानात चढ-उतार सुरू आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये थंडीचा कडका कायम आहे. तर उर्वरित राज्यातमध्ये तापमानात वाढ झाली आहे. दिवसा ऊन्हाचे चटके तर सकाळी आणि रात्री थंडावा जाणवत आहे. आज देखील राज्याच्या कमाल आणि किमाल तापमानात चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज अंदमानच्या समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. राज्यातील कमाल आणि किमान तापमानात आज चढ-उतार पाहायला मिळेल. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढेल. पूर्व विदर्भाच्या किमान तापमानात घट कायम राहण्याची शक्यता आहे. आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सोडता इतर भागात तापमानात काहीशी वाढ होऊन उकाडा जाणवेल.

Weather Update: विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका, कोणत्या जिल्ह्यात कसं राहिल हवामान?
Maharashtra Weather Update: धुळे @11°...!विदर्भ, उत्तर महाराष्ट्र गारठला; राज्यात आज कसं असेल हवामान, जाणून घ्या तुमच्या शहरातील तापमान

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. या ठिकाणी सर्वाधिक तापमान ३६.८ अंश सेल्सिअस इतके होते. तर, जेऊर, सातारा, सांताक्रूझ आणि रत्नागिरी येथे कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांपेक्षा जास्त होता. तर राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० अंशापेक्षा जास्त होते. यामुळे काही ठिकाणी दिवसा कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. तर सकाळी आणि रात्री हवेत गारवा राहत आहे.

Weather Update: विदर्भ अन् उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका, कोणत्या जिल्ह्यात कसं राहिल हवामान?
Weather Update: विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता; ६ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.