Weather Forecast: राज्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस होणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain News: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather Forecast
Maharashtra Weather ForecastSaam TV

Rain Alert in Maharashtra

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी राज्यात विजांचा गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटासह तुफान पाऊस (Heavy Rain) कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Maharashtra Weather Forecast
Mumbai Local Train: १४ एप्रिल रोजी मुंबईकरांचे होणार हाल; रेल्वेच्या तिन्ही मार्गावर असेल मेगाब्लॉक

काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होऊ शकते, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मुंबईसह पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. (Breaking Marathi News)

आंबाच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडावरील आंबे खाली पडले आहेत. तर दुसरीकडं लिंबू आणि भाजीपाला पिकांची देखील माती झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळीचं संकट लवकर दूर व्हावं, अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, हवामान विभागानं पुढील ४८ तासांत राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये विदर्भातील वर्धा आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. नागरिकांनी बाहेर पडताना योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलंय.

येत्या ४८ तासांत कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा , चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Weather Forecast
Hailstorm Hits Beed: बीड जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट; फळबागांसह शेतीचे माेठं नुकसान, 200 कोंबड्यांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com