Mumbai Local Train: १४ एप्रिल रोजी मुंबईकरांचे होणार हाल; रेल्वेच्या तिन्ही मार्गावर असेल मेगाब्लॉक

Mumbai Local Train Mega Block: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी रविवार १४ एप्रिल रोजी रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे.
Mumbai Local Train Mega Block
Mumbai Local Train Mega BlockSaam TV

Mumbai Local Mega Block on Sunday

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी रविवार १४ एप्रिल रोजी रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Mumbai Local Train Mega Block
Mumbai Landslide: मोठी बातमी! मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळली

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे ठाणे ते कल्याण अप आणि धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत ठाणे – कल्याणदरम्यानची अप आणि धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे या स्थानकांत थांबतील. (Breaking Marathi News)

दुसरीकडे हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहतील. यादरम्यान सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. (Latest Marathi News)

रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावरी बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत बोरिवली –गोरेगाव दरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद लोकल धीम्या मार्गावर धावतील. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Local Train Mega Block
Nalasopara News: हृदयद्रावक! खेळता खेळता बाथरुमध्ये गेला, अन् अनर्थ घडला; १८ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com