Maharashtra Weather : मान्सून केरळात कधी दाखल होणार? राज्यात कसं असेल वातावरण? हवामान विभागाने काय इशारा दिला?

Maharashtra Weather Update Today : राज्यात उष्णतेचा तडाखा वाढला असून मराठवाडा व विदर्भात उष्णतेची लाट, तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी. जाणून घ्या सविस्तर हवामान अपडेट.
MAHARASHTRA HEATWAVE AND THUNDERSTORM ALERT IMD WEATHER UPDATE
MAHARASHTRA HEATWAVE AND THUNDERSTORM ALERT IMD WEATHER UPDATESaam Tv
Published On
Summary
  • राज्यात उष्णतेची लाटसदृश परिस्थिती

  • काही जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

  • IMD कडून येलो अलर्ट जारी

  • मॉन्सून लवकरच केरळात दाखल होण्याची शक्यता

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असतानाच काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी वादळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेसोबतच बदलत्या हवामानाचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामान असून दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट दिला आहे.

IMD च्या अंदाजानुसार, आज कोकण पट्ट्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर येथे विजांसह पाऊस, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MAHARASHTRA HEATWAVE AND THUNDERSTORM ALERT IMD WEATHER UPDATE
Shocking : धक्कादायक! हॉटेलमधील कर्मचारी महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले, धमकी देऊन मालकाने अत्याचार केला

राज्यातील इतर भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. मात्र उन्हाचा चटका कायम राहणार आहे. दरम्यान, मॉन्सून यंदा २६ मेपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मॉन्सूनचे केरळात आगमन हे देशातील पावसाळ्याची अधिकृत सुरुवात मानली जाते. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळण्याची आशा आहे.

MAHARASHTRA HEATWAVE AND THUNDERSTORM ALERT IMD WEATHER UPDATE
Shocking : संतापजनक! आई-वडिलांच्या मृत्यूनंतर २ मुलींना काकाने विकले, नराधमांनी वर्षभर बलात्कार केला, व्हिडिओ सोशल मीडियावर केले अपलोड

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला, जळगाव, वर्धा आणि अमरावती येथे ४५ अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले. नागपूर येथे ४४ अंश, तर धुळे, परभणी, वाशीम आणि यवतमाळ येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. त्यामुळे राज्यात सध्या उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com