What is the climate in Maharashtra today? गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा परतला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात पुढील दोन दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील ४८ तास कोकणासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.
कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आजपासून पुढचे तीन दिवस ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे. विकेण्डला वातावरण बदलणार असून मान्सूनचे वारे पुन्हा वेगानं सक्रिय होणार आहेत.
यंदाच्या वर्षी जवळपास ३५ वर्षाच्या नंतर राज्यात मे महिन्यात राज्यातील काही भागात मान्सून दाखल झाला. मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. मात्र अजूनही संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला नसून जून महिन्यात आपल्याला पाऊस थांबलेलं पाहायला मिळत आहे. असं असताना आज आणि उद्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर,सांगली,सातारा या ठिकाणी ऑरेंज असून इथ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १४ जून नंतर राज्यात सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस.डी.सानप यांनी दिली.
यावेळी हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस.डी.सानप म्हणाले की, मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. येणाऱ्या ४ ते ५ दिवसांचा अंदाज पहिला तर आज आणि उद्या दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण कोकणात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. १४ तारखेनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच पाऊस मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. १५ तारखेनंतर सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच पाऊस आणि घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अजूनही राज्यभर पाऊस नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अस आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे यावर सानप म्हणाले की मे च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात चांगलं पाऊस झाला आहे यानंतर उघडीप पाहायल मिळाली शेतकऱ्यांना आवाहन आहे की कृषी विभागाकडून ज्या काही सूचना करण्यात आल्या आहे त्याचं पालन शेतकऱ्यांनी कराव जिथं ९० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाल आहे तिथं पेरणी करावी तसेच जिथं पाऊस झाल नाहीये तिथ पेरणी करण्याची घाई करू नका अस देखील हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.