एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच राज्यात (Maharashtra Weather Forecast) उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी, मालेगाव, मध्य महाराष्ट्रातील जेऊर आणि सोलापूर या शहरांमधील तापमान ४२ अंशांच्या वर गेलं आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ५ एप्रिलपासून राज्यामध्ये पावसाला पोषक हवामान तयार होईल, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे. (Latest Weather Update)
राज्यामध्ये उद्यापासून पावसाला पोषक हवामान (Maharashtra Weather) तयार होत आहे. अनेक शहरांमधील तापमान ४२ अंशापेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील चार दिवस अवकाळीचा इशारा दिला आहे. तर अनेक शहारांमध्ये तापमानाचा पारा ४२ अंशांपार गेल्याचं समोर आलं आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
५ एप्रिल (शुक्रवार) पासून राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह (Maharashtra Weather Update) वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यामध्ये तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर ५ ते ८ एप्रिलदरम्यान वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमधील हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Rain IMD Alert) आहे. शहर आणि उपनगरामध्ये आकाश निरभ्र राहील. मुंबईसह उपनगरात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला (Weather Update) आहे.
देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त तापमान (Weather) असेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 4 ते 6 एप्रिल दरम्यान आंध्र प्रदेश झारखंड, तेलंगणा आणि रायलसीमाच्या काही भागामध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) निर्माण होण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. 4 ते 7 एप्रिल दरम्यान पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागात देखील उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.