Maharashtra Weather Forecast: काळजी घ्या! मुंबईत उकाडा वाढला; कोकण, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update Today: आज कोकण आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
 उष्णतेच्या लाटेचा इशारा
Maharashtra Weather ForecastSaam Tv
Published On

आज राज्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर विदर्भासह कोकण आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र , उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा, हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर, पुणे, अकोला या जिल्ह्यांमध्ये उष्ण (Maharashtra Weather Update Today) लाटेसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. तर सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांना वादळी पावसासाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. काल अहमदनगरमध्ये अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यात उन्हाचा (Maharashtra Weather Forecast) तडाखा वाढला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये पुढील ५ दिवस हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आहे. काल उष्णतेमुळे राजस्थानमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये देखील उकाडा मोठ्या प्रमाणात (Monsoon Latest Update) वाढला आहे.

 उष्णतेच्या लाटेचा इशारा
Vidharbha Weather Alert: विदर्भ तापला! अंगातून घामाच्या धारा...घराबाहेर पडणं मुश्किल, हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

राजस्थानच्या बाडमेरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान ४८.८ अंशावर पोहोचलं आहे. जैसलमेरला लागून असलेल्या भारत-पाकिस्तान सीमेवर तापमान ५३ अंश सेल्सिअसवर आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावं, सोबतच जास्त पाणी पित काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. पावसाळा जवळ येत आहे. परंतु उकाड्यामुळे अंगाची काहीली होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे (Mumbai Heatwave) नागरिक हैराण झाले आहेत.

 उष्णतेच्या लाटेचा इशारा
Weather Update : पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला; अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार, उष्णतेच्या लाटेचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com