Maharashtra Weather Forecast: राज्यात उन्हाचा चटका कायम; 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Weather Update: राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान असल्याने ढगाळ हवामान होऊन, राज्याच्या कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे.
Maharashtra Weather Forecast
Maharashtra Weather ForecastYandex

Maharashtra Weather Forecast Update Today

राज्यामध्ये (Maharashtra) सध्या अवकाळी पावसाला पोषक हवामान आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी काल वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. काही ठिकाणी गारवा जाणवत आहे. (Latest Weather Update)

विदर्भातील वाशीम येथे आज राज्यातील उच्चांकी तापमानाची म्हणजेच ४१.२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज (Maharashtra Weather Forecast) आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण रात्रीसाठी येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट)

कर्नाटक, मध्यप्रदेश, विदर्भ, दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा अजूनही कायम आहे. राज्यामध्ये दिवसा उन्हाचा तडाखा असह्य होत ((Maharashtra Weather) आहे. तर रात्री प्रचंड उष्णता जाणवत आहेत. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता चांगलीच वाढलेली आहे. यातच सकाळी ढगाळ हवामान आणि रात्री वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

वाशीम, सोलापूर , अकोला, चंद्रपूर, जळगाव , बीड आणि ब्रह्मपूरी जिल्ह्यातील तापमान ४० अंशापेक्षा जास्त आहे. तर सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Weather Update) उष्ण रात्रीचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Maharashtra Weather Forecast
Maharashtra Weather Forecast: आज विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला उष्ण रात्रीचा इशारा

गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता

आजही विदर्भात आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.हवामान खात्याने एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली (Todays Weather) आहे. IMD ने म्हटलंय की, एप्रिल आणि मे मध्ये मैदानी भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त उबदार वारे वाहण्याची शक्यता आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात एप्रिलच्या सुरुवातीचे दिवस उष्ण असण्याची शक्यता आहे.

आसामध्ये काल वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. देशात आजही अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली (Maharashtra Weather Forecast Update) आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये 5 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे.

Maharashtra Weather Forecast
Weather Alert: छत्र्या बाहेर काढा! राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com