Maharashtra Weather Forecast: यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज; कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा; विदर्भात मान्सून केव्हा धडकणार?

Heat Wave Rain Alert Monsoon Update: कोकणामध्ये आज उष्ण दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे, तर विदर्भामध्ये उद्यापासून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात दिला आहे.
पावसाचा अंदाज
Maharashtra Weather ForecastSaam Tv
Published On

संपूर्ण देशात उष्णतेचा कहर जाणवत आहे. अनेक राज्यांमध्ये उष्मघातामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. आज राज्यातील स्थिती कशी असणार, ते पाहू या. विदर्भामध्ये आज उष्णतेची लाट, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये कोरडं हवामान असण्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्ण लाटेचा येलो अलर्ट जारी (Maharashtra Weather Forecast) करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बहुप्रतिक्षित मान्सूनचे भारतात आगमन झालेले आहे. मान्सून १० ते १५ जूनदरम्यान विदर्भात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे. तर ३ ते ४ जून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन अमरावतीसह विदर्भात (Rain Alert) होणार आहे. मान्सून केरळ कर्नाटक तामिळनाडूच्या काही भागात पोहचला आहे. सध्या अरबी समुद्रात जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. यावेळी मान्सूनचा पाऊस विदर्भात बंगालच्या उपसागरातून येण्याची शक्यता आहे.

आजपासून पुढील तीन दिवसात कमाल तापमानात घट (Heat Wave) होण्याची शक्यता आहे. आजपासून ६ जुनपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची गडगडाटासह शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यात ३ आणि ४ जूनला हलक्या पावसाची शक्यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

पावसाचा अंदाज
Konkan Rain: महाराष्ट्रातल्या कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल कशी समजते? समुद्राच्या लाटा आणि फेस याचा काय संबंध?

विदर्भामध्ये तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. त्यानंतर आज काही अंशी तापमान होईल, उद्यापासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने (Monsoon Update) दिलेल्या अंदाजानुसार २ जूनपासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि ब्रह्मपुरी येथे ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दिवसासह रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही उष्ण लहरी जाणवत आहेत.

पावसाचा अंदाज
Mumbai Rain: मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार; शहरात हलक्या पावसाच्या सरी बरसणार, हवामान विभागानं काय सांगितलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com