

Summary -
मोंथा चक्रीवादळानंतर कमी दाबाचे क्षेत्र विदर्भात सक्रिय झाले
नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार
उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
शेतकरी आणि नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. मोंथा चक्रीवादळ निवळल्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र आता विदर्भाच्या दिशेने पुढे सरकत आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तर मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून या ठिकाणी देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तर पालघर, नंदूरबार, धुळे, नाशिक, बुलडाणा, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता आहे. हा पाऊस लक्षात घेता नागिरक आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्तक राहावे. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, आठवडाभरापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाऊस पडत आहे. दिवसभरात कधी ऊन तर कधी पाऊस असा खेळ सुरू आहे त्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस झाल्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. हा नेमका हंगाम कोणता आहे? ऋतू कोणता आहे? हे मात्र कळायला तयार नाही अशी परिस्थिती सध्या झाली आहे. संभाजीनगरात सकाळी कोवळे ऊन, दुपारी कडक ऊन, सायंकाळी पावसाच्या सरी आणि रात्री गारवा या सगळ्यामुळे नागरिक गोंधळले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.