Weather Update: पुढील सात दिवस पावसाचे; महाराष्ट्रासह 'या' राज्यात धुवाँधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Weather Update Forecast: अरबी समुद्रावर कमी दाबाची पट्टा, तयार झालाय. यामुळे आयएमडीने महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि जवळपासच्या प्रदेशांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. दक्षिण आणि पश्चिम राज्यांमध्ये २५ ऑक्टोबरपर्यंत व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे
Weather Update Forecast:
Dark clouds over Mumbai skyline as IMD issues a heavy rainfall alert across Maharashtra and South India.x
Published On
Summary
  • हवामान विभागानं किनारी भागांसाठी वादळी वाऱ्यांचा इशारा

  • अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय.

  • महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण -पूर्व अरबी समुद्र आणि केरळ- कर्नाटकाच्या किनारपट्टीपासून ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर पश्चिमकडे सरकत असून पुढील २४ तासात डिप्रेशनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे पुढील सात दिवसांत, केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांवर १९-२३ ऑक्टोबर दरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर मिझोरममध्ये २३ ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९-२१ ऑक्टोबर दरम्यान ओडिशा, १९-२५ ऑक्टोबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यासह आणि पाऊस पडेल.

२१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भात तर २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान छत्तीसगड, १९-२३ ऑक्टोबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजाच्या कडकडाटसह पाऊस पडेल अशी शक्यता आहे.पश्चिम भारतातील पुढील तीन दिवसांत कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळाची शक्यता आहे.

तर २१ ऑक्टोबरला दक्षिण-पूर्वी बंगालच्या खाडीच्या वरती की दबाचा पट्टा बनण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासांत तामिळनाडू आणि केरळमधील कोइम्बतूर, निलगिरी, इरोड, तिरुप्पूर, थेनी आणि तेनकासी जिल्ह्यांतील घाट भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. चेन्नई आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने वेगळा अंदाज वर्तवलाय.

Weather Update Forecast:
Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

येथे विजांच्या कडकडटात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर तामिळनाडूमध्ये नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणात, हवामान कार्यालयाने सांगितले की, निलगिरीमधील कोठागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १४ सेंमी पाऊस झाला आहे, तर मायिलादुथुराई जिल्ह्यातील सिरकली येथे १ सेमी पावसाची नोंद झाली आहे.

Weather Update Forecast:
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com