विदर्भात शिंदेंकडून भाजपला धक्का; बड्या नेत्यासह ४५ माजी नगरसेवक अन् १०० सरपंच भाजपची साथ सोडणार

BJP MLA Shirish Chaudhari to Join Shiv Sena Shinde Faction: भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. हा पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी पार पडेल.
BJP MLA Shirish Chaudhari to Join Shiv Sena Shinde Faction
BJP MLA Shirish Chaudhari to Join Shiv Sena Shinde FactionSaam
Published On
Summary
  • नंदुरबारमध्ये भाजपला धक्का.

  • माजी आमदार शिंदे गटात जाणार.

  • एकनाथ शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार.

सर्व राजकीय पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहे. प्रत्येक नेत्याने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. कुठे पक्षफोडीचं राजकारण तर, कुठे मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच नंदुरबारमध्ये महायुतीतच फूट पडली असल्याचं चित्र आहे. भाजपचे माजी आमदार यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.

नंदुरबारचे सुपुत्र आणि अमळनेर विधानसभेचे माजी आमदार शिरीष चौधरी हे भाजप पक्षात आहेत. मात्र, आता त्यांनी भाजप पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. शिरीष चौधरी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शिरीष चौधरी यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला आहे.

BJP MLA Shirish Chaudhari to Join Shiv Sena Shinde Faction
लेकीच्या प्रेम विवाहाला कडाडून विरोध, जावईच्या आईला जिवंत जाळलं, मुलीच्या आई - वडिलांचा प्रताप

भाजप पक्षात राहून त्यांनी अमळनेर विधानसभेचा विकास केला आहे. मात्र, त्यानंतर चौधरी यांचा पराभव झाला. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्यात निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चौधरी धनुष्यबाण हाती घेणार आहेत. हा पक्षप्रवेश सोहळा उद्या मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.

BJP MLA Shirish Chaudhari to Join Shiv Sena Shinde Faction
निवडणुकीपूर्वी माजी रेल्वे मंत्र्यांच्या परिवाराला धक्का, IRCTC हॉटेल प्रकरणात अख्ख कुटुंब अडकणार

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील २५ माजी नगरसेवक, नंदुरबार येथील २० माजी नगरसेवक, १०० सरपंच तसेच कार्यकर्त्यांसोबत शिरीष चौधरी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणकीच्या तोंडावर शिरीष चौधरी यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com