Vande Bharat Express : देशात १८६ वंदे भारत एक्सप्रेस धावतात, महाराष्ट्रात संख्या किती? वाचा

Mumbai Pune Nagpur Vande Bharat Express routes and timings : बिहार-उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक वंदे भारत एक्सप्रेस धावतात. मुंबई, पुणे आणि नागपूर येथून निघणाऱ्या वंदे भारत ट्रेनची संपूर्ण यादी जाणून घ्या.
Vande Bharat
Vande Bharat x
Published On
Summary
  • २०१९ मध्ये देशात पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली होती.

  • देशात सध्या १६० पेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेस धावतात.

  • देशात सर्वाधिक वंदे भारत एक्सप्रेस उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातून धावतात.

  • महाराष्ट्रात मुंबई, नागपूर आणि पुण्यातून वंदे भारत धावतात.

Maharashtra Vande Bharat Express Trains full List : वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या विकासात मैलाचा दडग मानली जात आहे. २०१९ मध्ये देशात पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली होती. पाच वर्षांमध्ये देशातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 160 पेक्षा जास्त झाली आहे. जवळपास सर्वच राज्यातून वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. सर्वाधिक वंदे भारत एक्सप्रेस बिहार आणि उत्तर प्रदेशमधून धावतात. पण तुम्हाला महाराष्ट्रातून किती वंदे भारत एकस्प्रेस धावतात हे माहिती आहे का? मुंबई, पुणे आणि नागपूर याच स्थानकातून वंदे भारत एक्सप्रेस निघतात, हे तुम्हाला माहितेय का? (How many Vande Bharat Express trains run from Mumbai and Pune)

वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा बिहारमधून वंदे भारत एक्सप्रेस जास्त सुटतात. दोन्ही राज्यातून प्रत्येकी १४-१४ वंदे भारत एक्सप्रेस निघतात. रेल्वेच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रामध्ये सध्या 12 वंदे भारत एक्सप्रेस धावतात. यामध्ये मुंबईतून सहा, पुण्यातून दोन आणि नागपूरमधून पाच वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. मुंबई -गांधीनगर, मुंबई - शिर्डी, मुंबई -सोलापूर, नागपूर -बिलासपूर, आणि नागपूर - पुणे यांसारख्या मार्गांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची यादी पाहूयात.. Maharashtra Vande Bharat Express trains list in Marathi

Vande Bharat
Ladaki Bahin Yojana : या लाडक्या बहि‍णींनाच यापुढे ₹१५०० मिळणार, आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे, वाचा

मुंबईमधून कोणत्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावतात?

मुंबई ते शिर्डी

मुंबई ते सोलापूर

मुंबई ते मडगाव (गोवा)

मुंबई ते नांदेड

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल

Vande Bharat
Local Body Election : भाजपकडून निवडणुकीचा मास्टरप्लान, सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; राणे, मोहोळ, मुंडेंकडे मोठी जबाबदारी

नागपूरमधून कोणत्या वंदे भारत एक्सप्रेस धावतात?

नागपूर ते बिलासपूर

नागपूर ते पुणे

नागपूर ते इंदूर

नागपूर-सिकंदराबाद

पुण्यातून कोणत्या वंदे भारत धावतात?

पुणे ते कोल्हापूर

पुणे ते नागपूर

पुणे ते हुबळी

Vande Bharat
Local Body Election : भाजपकडून निवडणुकीचा मास्टरप्लान, सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; राणे, मोहोळ, मुंडेंकडे मोठी जबाबदारी

Maharashtra Vande Bharat Express trains Full list

Mumbai Central-Gandhinagar Capital Vande Bharat Express - 20901/20902

Bilaspur-Nagpur Vande Bharat Express - 20825/20826

Chhatrapati Shivaji Maharaj (T)-Sainagar Shirdi Vande Bharat Express - 22223/22224

Chhatrapati Shivaji Maharaj (T)-Solapur Vande Bharat Express - 22225/22226

Indore-Nagpur Vande Bharat Express - 20911/20912

Chhatrapati Shivaji Maharaj (T)-Madgaon Vande Bharat Express - 22229/22230

Nanded-Chhatrapati Shivaji Maharaj (T) Vande Bharat Express - 20705/20706

Mumbai Central-Ahmedabad Vande Bharat Express - 22961/22962

SCSM(T) Kolhapur-Pune Vande Bharat Express - 20673/20674

Nagpur-Secunderabad Vande Bharat Express - 20101/20102

Hubballi-Pune Vande Bharat Express - 20669/20670

Ajni-Pune-Ajni Vande Bharat Express - 26101/26102

Vande Bharat
Nagpur : नागपूर हादरले, ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, भाचीला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचेही निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com