Maharashtra Politics: उल्हासनगरात शिंदेसेनेला मोठा धक्का; महिला पदाधिकाऱ्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'; हाती घेतलं कमळ
उल्हासनगरात शिंदे सेनेला मोठा राजकीय धक्का
महिला पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
शहर संघटक सुषमा घाग यांचा राजीनामा
अजय दुधाणे, साम प्रतिनिधी
एकीकडे उल्हासनगरात शिवसेना, टीम ओमी कलानी आणि साई पक्ष यांची 'दोस्तीका गटबंधन' म्हणत युती झाली. तरी शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. शिवसेनेच्या शहर संघटक सुषमा घाग यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनाला जय महाराष्ट्र म्हटलंय. अनेक वर्ष काम करूनही पक्षात अन्याय होत असल्याचा आरोप करत या महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीमाने दिलेत. अनेक वर्ष काम करूनही आपल्या अन्याय झाल्याची भावना सुषमा घाग यांनी व्यक्त केली.
महिला पदाधिकाऱ्यांच्या राजीमान्यांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना महिला आघाडी प्रमुख मनीषा भानुशाली म्हणाल्या, शहरातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. महिला पदाधिकाऱ्यांना आपण पद वाटप केली त्यांचेच राजीनामा आपण घेत असल्यानं मनाला खुप दुख होतंय. अनेक वर्ष काम करूनही पक्षाकडून विश्वासात घेत जात नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.
भानुशाली यांनी पक्षश्रेष्ठींवरही टीका केली आहे. महिला आघाडीमधून कोणाला तरी उमेदवारी दिली पाहिजे, अशी मागणी केली. परंतु पक्षश्रेष्ठींनी मागणी मान्य केली आहे. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पण आता पक्षातील हायकमांडला काय बोलणार असं ही भानुशाली म्हणाल्या.
आपल्याकडे दगडी शाखेच्या महिला शहर संघटक सुषमा घाग यांनी राजीमाना दिलाय. त्यांच्यासह इतर महिला पदाधिकाऱ्यांनी राजीमाने दिलेत. उल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे, त्यामुळे त्यांनी हा राजीमाना दिला आहे. महिला कार्यकर्त्यांना मी अनेक पदे दिली आहे. त्यांना एकत्र करत होतो आज त्या आपल्याला राजीमाने देत आहे त्याचे दु:ख आहे. इतकेच नाही तर आपल्यालाही तीनवेळा डावलण्यात आले. परंतु आम्ही पक्षाशी कधी गद्दारी केली नाही. एकनाथ शिंदेंनी उमेदवारी देताना महिला आघाडीला साधं विश्वासात सुद्ध घेतलं नाही असं त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

