Maharashtra Politics : पक्षांवरच उलटली नेत्यांची रणनीती; कार्यकर्त्यांचा उद्रेक, विचारधारा घायाळ

Maharashtra Political News : आता आम्ही आपल्याला निवडणुकांचे एक असं वास्तव दाखवणार आहोत जे पाहिल्यानंतर तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक जर राजकारणात पडणार असतील तर त्यांनी एकदा नव्हे तर 10 वेळा विचार करणं गरजेचं आहे. पाहा महाराष्ट्राला उद्विग्न करणारं निवडणूकांचं जळजळीत वास्तव...
Maharashtra political news
maharashtra Politics Saam tv
Published On

आज जेव्हा तुम्ही ही बातमी पाहत आहात तो पर्यंत म्हणजेच गेल्या ९ वर्षांपासून (अहो जवळजवळ दशकभरापासूनच म्हणा ना) प्रतिक्षेत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी लोकशाही व्यवस्था बळकट करणारी निवडणूक ही अक्षरश बरबटवून टाकली होय.. बरबटवूनच. आज ज्यांना एबी फॉर्म मिळाला ते आनंदी तर ज्यांना डावललं त्याच्या पदरी पुढील 5 वर्ष निराशाच. लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेनं आज काय पाहीलं तर पाहा

Maharashtra political news
मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

एबी फॉर्म मागे पळणारे कार्यकर्ते

फार्म हाऊसवर लपून बसणारे नेते

नेत्यांचे पोस्टर फाडणारे इच्छूक

गेट तोडून कार्यलयात घूसुन हक्क मारणारे उमेदवार

उमेदवारी नाकारलेल्यानंतर त्रागा करणारे पदाधिकारी

एबी फॉर्म न दिल्यानं पक्ष कार्यालय फोडणारे उमेदवार

पक्षानं दिलेल्या उमेदवारीचा विरोध करणारे कार्यकर्ते

उमेदवारीसाठी जाळून घेणारे इच्छूक

उमेदवारी नाकारल्यानंतर बेहोश होणारे पदाधिकारी

Maharashtra political news
4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रात कधीही न पाहिलेलं हे दृष्य पाहून या कार्यकर्त्यांची कीव येते. कीव... या कार्यकर्त्यांच्या जळणाऱ्या मनाला आणि तीव्र संतापाला कुणीही वाली नाही हेच खरं कार्यकर्त्यांच्या या अवस्थेला जबाबदार कोण तर त्यासाठी जबाबदार आहेत

जास्त जागांसाठी शेवटपर्यंत युती आघाडी न करणारे नेते

सत्तेत राहण्यासाठी विचित्र युती आघाडी करणारे धुरंदर

निष्ठेऐवजी आयाराम गयारामांना पुन्हा पुन्हा संधी देणारे पक्ष

कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देणारं हायकंमाड

Maharashtra political news
आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण? संपूर्ण पुण्यात जोरदार चर्चा

या सगळयाचा उद्रेक उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झाला सत्तेची वाढती भूक भागवण्यासाठी जे नेत्यांनी केलं तेच आज कार्यकर्त्यांनी उघडपणे केलं. हाणामारी - बळजबरी करत अगदी तुरूंगात राहूनही उमेदवारी मिळवली...

मोठ मोठ्या राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी घातलेल्या विचित्र गोंधळामुळे एका विचारधारा घेऊन जन्मलेल्या पक्षांची शकलं उडाली आणि कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत धारातीर्थ पडले इतकं मात्र खरं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com