Maharashtra News: राज्यातील मोठ्या जिल्ह्यांत 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमणार

Additional Collectors Appointment: राज्यातील मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व विभागीय महसूल आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिलेत.
Additional Collectors
Additional Collectors Appointment:saam Tv
Published On

Edited by - Bharat Jadhav

राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत, मात्र अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. किमान 23 जिल्ह्यांत 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी नियुक्त करण्यात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने कामांचा ताण कमी होणार असल्याचं बावनकुळे म्हणालेत. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यात नवीन जिल्हे होणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज्यातील नवीन जिल्हे वाढणार नाहीत मात्र अतिरिक्त अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वाढवण्याचे प्रस्ताव महसूल विभागाकडे येत आहेत. हे कार्यालय वाढवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्य कामांचा भार कमी होण्यास मदत होईल. महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा तत्काळ निपटारा व्हावा.

Additional Collectors
Maharashtra Politics: छगन भुजबळ मालेगावात उलघडणार मनातील 'पत्ता'; अमित शहांशी करणार चर्चा

सुनावणीसाठी जी प्रकरणे आहेत, त्यावर योग्य कारवाई करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये संपूर्ण आस्थापनेसह कार्यान्वित करणार असल्याचं बानवकुळे म्हणालेत. याबाबत सर्व विभागीय आयुक्तांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या आहेत. सर्व विभागीय महसूल आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशदेखील त्यांनी दिले आहेत.

Additional Collectors
Maharashtra Politics: असली कोण, नकली कोण हे दाखवून दिलंय, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

समजा दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूरला झाले तर त्यांच्या कामांचा भार कमी होईल. एका बाजुला ४ ते ५ तालुके तर दुसऱ्या बाजुला ५ ते ६ तालुक्यांचा कार्यभार विभागाला जाईल. अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना एवढ्या १०० दिवसात तयार करण्याचा विचार सरकारचा असल्याची माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली. कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत, मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा वाढता ताण हा मात्र कमी होणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना लवकरात लवकर करणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजी नगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव १०० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून केला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com