ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट किती रुपयांनी महागणार?

Maharashtra ST Bus Fare Hike : महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या 13.50% भाडेवाढ प्रस्तावावर आज अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तिकीट दर, पाच रुपयांच्या पटीतला बदल, आर्थिक तूट आणि प्रवाशांवर होणारा परिणाम जाणून घ्या.
Maharashtra ST Bus Fare Hike
Maharashtra ST Bus Fare Hikegoogle
Published On

राज्यातल्या लाखो एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने 13.50 टक्के भाडेवाढीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. बैठकीत परिवहन प्राधिकरणाच्या (STA) बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

यंदा १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यानंतर या वाढीला १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत आज संपत असल्यामुळे आता नवीन प्रस्तावानुसार एकूण भाडेवाढ 13.50 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच, सध्या लागू असलेल्या 10 टक्के वाढ होऊ शकते.

Maharashtra ST Bus Fare Hike
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

यावेळी आणखी एक महत्त्वाचा बदल प्रस्तावित केला आहे. सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे वाद टाळण्यासाठी एसटीचं तिकीट पाच रुपयांच्या पटीत ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोघांनाही सुट्ट्या पैशांची अडचण कमी होईल, असा महामंडळाचा दावा आहे.

महामंडळाच्या म्हणण्यांनुसार, कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या भत्त्यांमध्ये वाढ, डिझेलचे वाढलेले दर, टायर आणि बसच्या सुट्या भागांच्या किमतीत झालेली वाढ यामुळेच वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आर्थिक खर्च भरून काढण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचं महामंडळाचे मत आहे.

Maharashtra ST Bus Fare Hike
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी! बंद झालेला ₹1500 चा हप्ता पुन्हा सुरू होणार, आदिती तटकरेंनी दिली अपडेट

पण फक्त भाडेवाढ करूनही महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. मे महिन्यात एसटीचे वाहतूक उत्पन्न 1,047.17 कोटी रुपये होतं, तर खर्च 1,096.07 कोटी रुपये झाला. राज्यातल्या 31 पैकी 22 विभागांना स्वतःचा खर्चही भागवता आलेला नाही. याआधी जानेवारी 2025 मध्ये 14.95 टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. आता प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास नवीन दर तातडीने लागू होण्याची शक्यता आहे.

Maharashtra ST Bus Fare Hike
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com