मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी होणाऱ्या राज्याच्या विशेष अधिवेशनात राज्य सरकार मराठा आरक्षण संदर्भात मोठा निर्णय घेऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि मागासलेपणा संदर्भात विधेयक उद्या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. तसेच याचं कायद्यात रूपांतर केलं जाऊ शकतो.
मंगळवारी होणाऱ्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे. यामध्ये मराठा आरक्षण संदर्भातील विधेयकाचा उल्लेख आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यात या विधेयकला "सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक १ - महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक, २०२४", असं नाव देण्यात आलं आहे. (Latest Marathi News)
विशेष अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिकेत सांगण्यात आ आहे की, हे विशेष अधिवेशन मंगळवारी सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. यानंतर राज्यपाल अभिभाषण करतील. यानंतर गटनेत्यांचे भाषण होईल आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचे भाषण होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होणार असल्याचं यात सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी विशेष अधिवेशनात आधी मराठा आरक्षणासंदर्भात प्रस्ताव सादर केला जाईल. त्यानंतर विधान परिषदेत ते विधेयक प्रथम वाचन, द्वितीय वाचन, तृतीय वाचन या तीन अवस्थांमधून जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.