

कदम
हा व्हिडीओ नीट पाहा. अहिल्यानगरच्या सौंदाळा गावात हा दशक्रिया विधी सुरू होती. त्यामुळे कुणाचं तरी निधन झालंय आणि त्याच्याच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचं नक्कीच वाटेल. मात्र हे आहेत सौंदाळा गावचे सरंपच शरद आरगडे. तब्येतीनं ठणठणीत. यांनी जिवंतपणीच गावातल्या स्मशानभूमीत स्वत:चा दशक्रियाविधी आयोजित केला. विशेष म्हणजे पिंडदान करण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगाही या उपस्थित होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पिंडीला कावळाही शिवलाय. आता बोला.
खरंतर, सौंदाळा गावाने आजवर अनेक सामाजिक परिवर्तनाचे निर्णय घेतलेत. जातमुक्तीचा ठराव करून जाती-धर्माच्या अनिष्ट रुढींना छेद दिला. इतकंच नाहीतर शिवी दिल्यास 500 रुपयांच्या दंडाचीही तरतूद केलीये. आता याच गावच्या सरपंचांनी सत्यशोधक पद्धतीनं पिंडदान करून अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय.
आरगडे एवढ्यावरच थांबले नाहीत तर निधनानंतर आपल्या पत्नीला समाजातील जाचक रुढींमध्ये अडकवू नका, असं प्रतिज्ञापत्राचं लिहून ठेवलंय. खरंतर, सध्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूबाबांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. महाराष्ट्र दिवसेंदिवस अघोरी होत चाललाय. अशावेळी सरपंच आरगडेंनी समाजाला दाखवलेला सत्यशोधक पॅटर्न समाजाला भोंदूगिरीच्या विळख्यातून बाहेर काढण्यास नक्कीत मदत करेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.