Rajya Sabha: मोठी बातमी! राज्यसभेसाठी मुंडे यांचे नाव चर्चेत; ऐनवेळी भाजपच्या गोटात बदलाचे वारे,पडद्यामागे घडतंय काय?

Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील सात जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका १६ मार्च रोजी होणार आहेत. मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली आहे.
Rajya Sabha Election:
Minister Pankaja Munde hints at discussions over Pritam Munde for the upcoming Rajya Sabha polls in Maharashtra.saam tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी १६ मार्चला मतदान.

  • महायुतीला ६ तर महाविकास आघाडीला १ जागेची शक्यता.

  • भाजपाच्या वाट्याला सर्वाधिक ४ जागा अपेक्षित.

राज्यसभेच्या ३७ जागा रिक्त होत होणार असून यातील ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांच्या अनुषंगाने आता घडामोडींना वेग आलाय. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली, त्याचदरम्यान मोठी घडामोड घडताना दिसत आहे.

Rajya Sabha Election:
Vidhan parishad Leader: राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडीचा लागणार निकाल?

राज्यसभेच्या ७ जागांसाठी येत्या १६ मार्चला निवडणूक पार पडणार आहे. राज्यातील सर्वाधिक ४ जागा भाजपाच्या वाट्याला येणार आहेत. यात शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक-एक जागा मिळणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत एका जागेवरून चढाओढ दिसून येते. उद्धवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत एका जागेवरून खलबते सुरू आहेत. यातच राज्यसभेसाठी प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आहे, अशी माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलीय.

Rajya Sabha Election:
केरळनंतर आणखी एका राज्याचं नाव बदलणार? भाजप खासदाराचं गृहमंत्र्यांना पत्र

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी भाजपकडून राज्यसभेसाठी काही नावे निश्चित करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे आदी दिग्गज नेते उपस्थित होते. याबाबत विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्याविषयी मोठा खुलासा केला.

राज्यसभेसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यापैकी एक नाव प्रीतम मुंडे यांचे असल्याची माहिती पंकजाताई म्हणाल्या. प्रीतम मुंडे आधी खासदार होत्या. पण यावेळी पक्षाच्या आदेशानुसार मी लोकसभा लढवली होती. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी पक्षाचे काम केलं, तसेच त्यांनी खासदार म्हणून काम केलेले आहे. आता प्रीतम मुंडे यांच्या नावाबरोबरच आणखी काही नावे चर्चेत आहेत. आता बाकी निर्णय आमच्या पक्षाचे सर्व नेते घेतील, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

भाजपच्या बैठकीत काय चर्चा झाली?

या बैठकीत विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली आहे. बैठकीत काही इतर नावांचाही विचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पर्याय निवडताना पक्ष अनुभव, निष्ठा आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा विचार केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com