राज्यात आज वादळी पावसाचा अंदाज
हवामान विभागाने वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
येलो अलर्ट असलेल्या भागांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात
Maharashtra Today Rain Update News राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका कायम असला तरी वातावरणात हळूहळू बदल होत असून पावसाला पोषक परिस्थिती निर्माण होत आहे. IMD ने आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरात आज ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून पावसाची रिमझिम सुरु राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये, तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येलो अलर्ट जारी करण्यात आलेल्या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दरम्यान, जळगाव, पुणे, सांगली, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतही विजांसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोकणातील काही भागांमध्येही ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात. राज्यातील अनेक भागांत दिवसा उकाडा कायम राहणार असून, सायंकाळनंतर वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.