Maharashtra Rain News: राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; कसं असेल आजचे हवामान? वाचा वेदर रिपोर्ट..

Maharashtra Rain Weather Update IMD Alert Today: मुसळधार पावसानंतर राज्यात अनेक धरणे काठोकाठ भरली असून बहुतांश नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. या धुवाँधार बॅटिंगनंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे.
Maharashtra Rain News: राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; कसं असेल आजचे हवामान? वाचा सविस्तर...
Weather Update in Maharashtra 9 July 2024Saam TV
Published On

गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यामध्ये राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला होता. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सर्वच जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. या मुसळधार पावसानंतर राज्यात अनेक धरणे काठोकाठ भरली असून बहुतांश नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. या धुवाँधार बॅटिंगनंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. कसं असेल आजचा हवामान अंदाज? वाचा सविस्तर..

Maharashtra Rain News: राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; कसं असेल आजचे हवामान? वाचा सविस्तर...
Navi Mumbai : पुण्यातील तरुणाला लाखो रुपयांचा गंडा; नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे नाव वापरून फसवणूक

कसं असेल आजचे हवामान?

राज्यामध्ये आता पावसाचा जोर ओसरला असून आज फक्त पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यामध्ये कोकणामधील रायगड जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि वर्धा, तसेच धुळे जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट

त्याचबरोबर आज धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभगाने वर्तवली आहे. तसेच रायगड, सातारा, रत्नागिरीच्या घाटमाथ्यावर पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याने या भागांतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain News: राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; कसं असेल आजचे हवामान? वाचा सविस्तर...
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

पुण्यात जोर ओसरला!

पुणे शहरातही पावसाचा जोर ओसरला असून आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या आठवड्यात पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा तयार झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain News: राज्यात पावसाचा जोर ओसरला! 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी; कसं असेल आजचे हवामान? वाचा सविस्तर...
Maharashtra Politics 2024 : भाजप वाढवणार ठाकरेंचं टेंशन?; कोकण, मुंबईसाठी भाजपचा मास्टर प्लॅन?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com