Marathi News Live Updates : कोल्हापूर जिल्ह्याला 26 व 27 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, शाळांना दोन दिवस सुट्टी

Maharastra Breaking News Today Mumbai Rain Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई तसेच पुण्यातील पावसाचे अपडेट्स लोकल ट्रेन मराठी बातम्या वाचा एका क्लिकवर....
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

कोल्हापूर जिल्ह्याला 26 व 27 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट, शाळांना दोन दिवस सुट्टी

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

26 व 27 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

पंचगंगेने देखील सध्या धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे शाळांना सुट्टी देण्याचे आदेश जारी

कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, खबरदारी म्हणून उद्या शाळांना सुट्टी

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढती पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिराळा,पलूस,वाळवा आणि मिरज तालुक्यातल्या सर्व शाळा/ महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातल्या रेड अलर्ट व वारणा,कृष्णा नद्यांची वाढती पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी हा निर्णय घेतला आहे.

Pune School : पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळां, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. मुळशी मावळ खेड जुन्नर आंबेगाव या तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Pune News : पुण्यात आज ६ जणांचा मृत्यू, तिघांचा विजेचा धक्का लागून तर दोन जण गेले वाहून

आज दिवसभरात पुणे जिल्ह्यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील डेक्कन भागात अंडा भुर्जी स्टॉल वर काम करत असलेल्या तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. एका तरुणाचा ताम्हिणी घाटात मृत्यू झाला आहे. तर कात्रज लेकटाऊन जवळ १ व अष्टभुजा येथे एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

अंधेरीतील प्रसिद्ध गावदेवी डोंगराचा काही भाग कोसळला

मुंबईत मुसळधार पावसामुळे अंधेरीतील प्रसिद्ध गावदेवी डोंगरचा काही भाग कोसळला आहे. अंधेरी पश्चिमेकडील जुहू गल्ली परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग कोसळल्याची माहिती आहे. गावदेवी डोंगर हा हेरिटेज वास्तू म्हणून ओळखला जातो. यात दोन वाहनांचं देखील नुकसान झालं आहे. अंधेरीत गावदेवी डोंगर गिल्बर्ट हिल नावाने ओळखला जातो. ज्वालामुखीच्या बेसॉल्ट दगडाने बनलेली ही अत्यंत पुरातन असून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी बनलेला हा डोंगर आहे.

Dhule Surat Highway : धुळे सुरत महामार्गावरील पूलाला पडलं भगदाड

धुळे सुरत महामार्गावरील पूलाला भले मोठे भगदाड पडलं आहे. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने भगदाड पडल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. कुसुंबा ते अकलाड मोराने गावादरम्यान दरम्यान हे भगदाड पडलं आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.

Indian Railway : पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या ३ रेल्वे उद्या रद्द, मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्विन, प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या तीन रेल्वे उद्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यातून उद्या मुंबईला जाणाऱ्या सकाळच्या सत्रातील रेल्वे गाड्या रद्द झाल्याने एस टी बस वर ताण येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या आणि मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

Pune Rain : पुण्यात कात्रजमध्ये २ जण बुलाडे,  पुराच्या पाण्यात पोहताना दुर्घटना

पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पाणी साचलं आहे. दरम्यान कात्रजमध्ये पाण्यात पोहताना दोन जण वाहून गेले आहेत.

Thane Rain News : ठाण्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर,  मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा निर्णय

मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने ठाण्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे.

Pune Rain : आता पुण्यातील बत्ती गुल; पाण्याचा वेढा वाढला

पुण्यातील एकतानगरमध्ये पाणी साचत असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. त्यात आता वीजही गायब झाली आहे. दरम्यान उद्या देखील पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

Pune News : पुण्यातील पाटील इस्टेटमधील ४०० नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं

पुण्यातील पाटील इस्टेटमधील चारशे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. मुळा आणि मुठा नदीचे पाणी गुरवार मध्यरात्रीपासून वाढल्याने पाटील इस्टेट शिवाजीनगर येथील जवळापास चारशे नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये सरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.

बदलापूरच्या बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता, पुराचा धोका वाढला

बदलापूरच्या बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. एमआयडीसीकडून कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि मुरबाडच्या तहसीलदारांना पत्र पाठवण्यात आलं आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बारवी धरणाची पाणीपातळी सध्या ६८.१५ मीटर इतकी आहे. ७२.६० मीटर पाणीपातळी गाठताच स्वयंचलित दरवाज्यांमधून आपोआप पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे.

मुंबईच्या बोरीवली पूर्व मागाठाने येथील इमारतीला आग, एकाचा होरपळून मृत्यू

मुंबईच्या बोरीवली पूर्वेकडील मागाठाने येथील एका इमारतीला आग लागली होती. मेट्रोस्थानकासमोरील कणकीया समर्पण टॉवर या इमारतीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याची दुर्घटना घडली. यात एकाचा मृत्यू झाला आहे.

Kalyan Rain News : कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्याने रेतीबंदर परिसर जलमय

कल्याण खाडीची पाणी पातळी वाढल्याने रेतीबंदर परिसर जलमय झाला आहे. खाडी किनारी राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी ,शिरलं आहे. रेतीबंदर परिसरात असलेल्या अनेक तबेल्यामध्ये पाणी शिरलं आहे. तबेला चालक ,स्थानिकांकडून म्हशींना सुखरुप बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

Raigad Rain News : पेणच्या हटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले, भोगावती नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पेण हटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून 3.35 घमी/से पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ मोठी वाढ झाली आहे. हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत ८३ टक्के वाढ झाली आहे.

Kalyan Rain News : कल्याण खाडी किनाऱ्यावरून १५ नागरिकांची सुटका, अद्यापही काहीजण अडकलेत

कल्याण खाडी किनाऱ्यावर घरात अडकलेल्या नागरिकांची केडीएमसीने सुटका केली आहे. केडीएमसी आणि अग्निशमन विभागाने बोटीच्या सहाय्याने बाहेर काढलं आहे. अद्याप काही जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

IMD Rain Alert : मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या २४ तासात अतिमुळधार, IMD चा इशारा

IMD यांनी मुंबई, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यात पुढील २४ तासाकरीता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरीकांनी सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन कराव्ं, असं आवाहन मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे.

नागोठाणे शहराला पुराचा वेढा, अंबा नदीचं पाणी शिरलं पाण्यात

नागोठाणे शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून अंबा नदीचं पाणी शहरात शिरलं आहे. बाजारपेठ, एस टी स्टँड, कोळीवाडा, मोहल्ला परिसरात ३ फूट पाणी साचलं आहे. अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात झालीप आहे. भरतीची वेळ असल्याने पाणी वाढण्याची शक्यता आहे.

Pune Rain : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, पुण्यातील एकतानगरमध्ये धोका वाढला

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकतानगरमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे. एकतानगरमध्ये गुडघा भर पाणी साठले आहे. खबरदारी एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

Pune Rain News : १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी; मुसळधार पावसामुळे निर्णय

पावसामुळे जे विद्यार्थी दहावी, बारावीची परीक्षा देऊ शकले नाही. त्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Badlapur Rain News : उल्हास नदीला पूर, बदलापुरात एनडीआरफची टीम दाखल

बदलापुरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. उल्हास नदीला पूर आल्यानं एनडीआरएफची टीम बदलापुरात पोहोचली आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास एनडीआरएफची मदत होणार आहे.

Kalyan Rain Update : कल्याणमध्ये पावसाचा जोर वाढला, वालधुनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली

कल्याणमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. वालधुनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. वालधुनी नदी काठावर असलेल्या शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

pawna dam area : पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणात 72 टक्के इतका पाणीसाठा झालाय. त्यामुळे पवना धरणातून दुपारी 4 वाजता 1400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग विद्युतगृहाद्वारे करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार हा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Satara Rain Update: साताऱ्याला अतिवृष्टीचा इशारा; शाळा, कॉलेज आणि अंगणवाडी एक दिवस बंद राहणार

सातारा जिल्ह्याला 25 आणि 26 रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज, अंगणवाडी यांना एक दिवसाच्या सुट्टीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला आहे.

Vasai News: वसईतील मुंबई - अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

वसईतील मुंबई -अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुसळधार पाऊस त्यात महामार्गावर पडलेले खड्डे त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

Navi Mumbai: नवी मुंबई एमआयडीसीमधील रस्ते जलमय

मुसळधार पावसामुळे नवी मुंबई एमआयडीसीमधील रस्ते जलमय झाले आहेत. नवी मुंबईतील आयटी पार्कला जोडणारे रस्ते जलमय झालेत. एमआयडीसीमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांसह प्रवाशांचे हाल होत आहेत.

Satara News:  साताऱ्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही

साताऱ्यातील बोपर्डी गावात पावसाने घराची भिंत कोसळली. वाई तालुक्यातील बोपर्डी गावामध्ये सतत पडणाऱ्या पावसाने राहत्या घराची भिंत कोसळली. गणेश किर्दत यांच्या घराची भिंत कोसळली .सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Nashik News: नाशिकमध्ये संततधार पाऊस, वाहनावर पडले झाड

नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील शिंगाडा तलाव परिसरात मुख्य रस्त्यावर झाड पडल्याची घटना घडलीय. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वाहनावर हे झाड पडल. मात्र यात केवळ वाहनाचं किरकोळ नुकसान झालंय.

Nashik News: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात दरड कोसळली

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणाच्या परिसरात दरड कोसळली. इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली धबधबा परिसरात दरड कोसळली. धबधबा परिसरातील रस्त्यावर डोंगरावरील दगड कोसळले. आज पर्यटकांची गर्दी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

Pune News: अजित पवार यांची आपत्कालीन विभागात हजेरी, पावासाचा घेतला आढावा

पुणे जिल्ह्यातील पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे महानगरपालिका आपत्कालीन विभागांमध्ये अजित पवार यांनी हजेरी लावलेली आहे. सुहास दिवसे यांच्याकडून म्हणजेच पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडून पुणे शहरातली तसेच पुणे जिल्ह्याची माहिती घेऊन याच्यावर काय उपाययोजना केली जाईल याच्यावर अजित पवार यांनी चर्चा केलेली आहे.

Satej Patil Meet D.K Shivkumar: सतेज पाटलांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट 

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेतली. पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीबाबत दोघांशी चर्चा केली. अलमट्टी धरणातून पाणी नियंत्रणात सोडण्याची केली विनंती. डी के शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची सतेज पाटील यांची माहिती.कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना अलमट्टी धरणातून सोडलेल्या पाण्याचा बसतोय मोठा फटका.

Supreme Court: राज्यांना खनिज आणि खाण जमिनींवर कर वसूल करण्याचा पूर्ण अधिकार' सुप्रीम कोर्ट

'खाण आणि खनिज विकास आणि नियमन कायदा (MMDR) कर गोळा करण्याच्या राज्यांच्या अधिकारांवर मर्यादा घालता येणार नाही'

'राज्यांना खनिज आणि खाण जमिनींवर कर वसूल करण्याचा पूर्ण अधिकार' सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बहुमताने दिला निकाल.

खनिजांवरील कर वसुलीच्या प्रकरणावरील निकाल सुप्रीम कोर्टाने मार्च महिन्यात राखून ठेवला होता

काही राज्य सरकार आणि खाण कंपन्यांच्या वतीने दाखल झालेल्या 86 याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती.

AAP New Office Delhi: आम आदमी पक्षाला मिळालं नवे ऑफिस

आम आदमी पक्षाला मिळाल नवं ऑफिस

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने आम आदमी पक्षाला नवे ऑफिस दिले आहे. बंगला क्रमांक १, रविशंकर शुक्ला लेन नवी दिल्ली हा आम आदमी पक्षाच्या मुख्यालयाचा नवीन पत्ता असणार आहे. लवकरच आपच कार्यालय नव्या मुख्यालयात येणार आहे.

Pune Rain News: पुण्यात पावसाचे थैमान! गोठा बुडून १४ जनावरे दगावली

वारजेतील स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रालगत गोठ्यात ही जनावरे बांधली होती. रात्री अचानक पाऊस सुरू झाला आणि नदीपात्रातील पाणी वाढले. हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला होता. या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत.. यात 11 गाई आहेत.. तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावली आहेत..

Mumbai Rain News: सात दिवसात अंधेरी सबवे वर तोडगा काढा, ठाकरे गट आक्रमक

मुंबईत थोड्याशा पावसानेही अंधेरी सबवे हा पाण्याखाली जातो. यामुळे अंधेरी पूर्व भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आज अंधेरी सर्वे दिवसभरात तिसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे अंधेरी समवेची आमदार ऋतुजा लटके यांनी पाहणी केली यावेळी माध्यमांशी बोलताना ऋतुजा लटके यांनी आक्रमक होत पालिका आयुक्तांना इशारा दिला सात दिवसाच्या आत अंधेरी समवेतील पाणी साचण्याच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही तर सबवेतील पाणी डायव्हर्ट करून पालिका कार्यालयात सोडण्याचा इशारा देखील आमदार लटके यांनी दिला

Mumbai Weather Update: मुंबईकरांनो सावधान! पुढील २४ तास महत्वाचे

हवामान खात्याकडून पुढील 24 तासासाठी नवा अंदाज जारी. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता. काही ठिकाणी अत्याधिक मुसळधार पाऊस होणार असल्याची दाट शक्यता. शहर आणि उपनगरात वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने असणार.

Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान!

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे परिणामी मुंबईतील अनेक सखल भाग जे आहेत ते पाण्याखाली केले आहे पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी संवेदेखील पाण्याखाली गेला आहे सगळे परिसरात असणाऱ्या दुकान आणि झोपडपट्ट्यांतील घरांमध्ये देखील पाणी घुसले आहे संवेद पाच फुटापेक्षा अधिक पाणी साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे यामुळे वाहन चालकांना मोठी अडचण देखील होत आहे.

Raj Thackeray: 'विधानसभेला २२५ जागा लढवणार', राज ठाकरे

येणाऱ्या निवडणुकीत आपल्या मनसेचे लोक सत्तेत काहीही करून बसवायचे आहे.

काही लोक हसतील...पण तर घडणार म्हणजे घडणार...

तुमच्यासोबत येतील...

युती होईल का आघाडी होईल का असा काही विचार करू नका...

२२५ जागा आपण लढवणार आहोत

Maharashtra Rain News: बदलापूर- कर्जत महामार्ग बंद

ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर येऊन बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे.

Maharashtra Rain News: मुंबई, पुणे, ठाणे, रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने मुंबई, मुंबई उपनगर, पुणे , ठाणे , रायगड जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

Pune Rain News: पुण्यात पावसाचा हाहाकार, अनेक छोटे, मोठे पूल पाण्याखाली

पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.

Pune Rain News: पोलीस कस्टडीत गुडघाभर पाणी 

- पुण्याच्या राजगुरुनगर येथील पोलीस कस्टडीच्या खोलीत साचले गुडघाभर पाणी. राजगुरुनगर पोलीस स्टेशन पोलीस लॉकाअप.(कस्टडी) ही राजगुरुनगर तहसिलदार कार्यालयाजवळ असुन गेली दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाने येथील चारही कस्टडी रुम मध्ये गुडघा भर पाणी शिरले आहे. कस्टडीत सध्या एकही आरोपी नसुन सध्या कस्टडीतुन पोलीस कर्मचारीच पाणी काढत आहेत.

Maharashtra Rain News: राज्यात पावसाचा कहर! २४ तासात ४ मृत्यू 

महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या २४ तासात ४ व्यक्ती मृत पावले असून ०१ व्यक्ती जखमी झाले

आहेत. पुण्यामध्ये नदीपात्रात वाढ झाल्याने अुंडा भूर्जीची गाडी हलवताना विजेचा शॉक लागून ३

व्यक्ती मृत्यू झाला. मौजेआदरवाडी, तालुका मुळशी येथे दरड कोसल्यामुळे एकाचा मृत्यू. लवासा येथे एक घरावर दरड कोसळली आहे. प्राथवमक अुंदाजानुसार कोणीही अडकल्या असल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. शोध बचावासाठी पाठक रवाना करण्यात आले आहेत.

Pankaja Munde:  समर्थकांच्या आत्महत्येने व्यथित ; वाढदिवस साजरा करणार नाही: पंकजा मुंडे

समर्थकांच्या आत्महत्येने व्यथित झाल्यानं, वाढदिवस साजरा करणार नाही, हारतुरे नको फक्त शुभेच्छांचा एक एसएमएस करा..असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना व्हिडिओ जारी करून केलं आहे.

Mumbai Rain News: उपनगरात मुसळधार पाऊस; दहिसर एस वी रोड पाण्याखाली

मुंबईत पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. काही काळापूर्वी पावसाने उसंत घेतली होती यानंतर आता पुन्हा मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे हवामान खात्याकडून मुंबईला आलो देखील देण्यात आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर भागात मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे यामुळे उपनगरातील अनेक सखल भाग हे पाण्याखाली गेले आहेत दहिसर पूर्वेकडील एस वी रोड आणि शिवाजी रोड परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे.

Raigad Rain News: रायगडमध्ये दरड कोसळली; पाचाड - रायगड रस्ता बंद

रायगड ब्रेकिंग :

० रायगड रस्त्यावर दरड कोसळली असून पाचाड ते रायगड रस्ता बंद झाला आहे. रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम सुरु असून पोलीस, रस्ता बांधकाम ठेकेदाराची यंत्रणा घटना स्थळी दाखल झाले आहेत.

Pune Rain News: पुणे आयुक्तांकडून बचावकार्याचा आढावा

पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षात पुणे शहरातील मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी बचाव मदतीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Palghar Thane School Closed: ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर

पालघरसह ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी . जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शाळांना सुट्टी . तर जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारून सुट्टी जाहीर केल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी . एकाच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळे आदेश काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम .

Pune Rain News: पुण्यातील खिलारेवाडी भागातील नागरिकांचे स्थलांतर

पुण्यातील खिलारेवाडी भागातील नागरिकांचे स्थलांतर

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. पुण्यातील खिलारे वाडी येथील पाणी साठल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांची सहायता करत त्यांना आधी घरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

Maval Rain News: मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे ४ दिवस बंद

मावळ आणि मुळशीमधील सर्व पर्यटनस्थळे पुढील ४ दिवस बंद राहणार आहेत. मावळ आणि मुळशी भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रशासनाचा निर्णय. या दोन्ही भागात विविध पर्यटन स्थळे ज्यामध्ये मंदिरे, धबधबे असे अनेक ठिकाणं आहेत. या सर्व ठिकाणी जाण्यास आता प्रशासनाने प्रतिबंधक आदेश लागू करण्यात आले आहेत.

Kalyan News: उल्हास नदीची पाणी पातळी वाढली

उल्हास नदीची पाणी पातळी वाढली!

केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र ठप्प. कल्याण पश्चिम सह मांडा, टिटवाळा, उंबरणी , बल्याणी,आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेकडील काही भागतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्र चालू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल केडीएमसीची माहिती.

Amravati News:  शेतमजुरांना घेऊन जाणारा ऑटो उलटला, 10 शेतमजूर जखमी

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील तिवसा येथील प्रवासी वाहनाचा भीषण अपघात झाला. गावातील शेतमजूर तिवसा सार्शी मार्गावरील शेताकडे घेऊन जात असताना ऑटो समोर कुत्रा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. ज्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला वाहन सिमेंट नालीला धडकले.  या अपघातात 10 मजूर जखमी झाले आहेत,यातील 5 मजूर गंभीर जखमी झाल्या आहेत पुढील उपचारासाठी जखमीना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Kolhapur News:  कोल्हापूरच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली

कोल्हापूरच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केलं बैठकीचे आयोजन

बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांना बोलावलं

दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार बैठक

पूर स्थितीचा आढावा आणि पुढील नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित केली बैठक

Radhanagari Dam: राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा उघडला..

राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.

Pune Rain News : पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात शिरले पाणी

पुणे शहरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुण्यातील शनिवार पेठेत असलेल्या ओंकारेश्वर मंदिरात पावसाचं पाणी शिरलंय. मंदिराच्या शेजारी असलेल्या मुठा नदीत खडकवासला धरणाच्या पाण्याचा विसर्ग होतोय. सकाळच्या सत्रात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर शिरले पाणी शिरलंय.

Pune Rain News : ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासात ५५६ मिलिमीटर पाऊस

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय. लोणावळा, शिरगाव, कोयना परिसरात तुफान पाऊस झालाय. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासात ५५६ मिलिमीटर पाऊस पडलाय. सकाळी ८.३० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

ताम्हिणी: ५५६ मिलिमीटर

लोणावळा: ३११ मिलिमीटर

कोयना: १५७ मिलिमीटर

शिरगाव: ४८४ मिलिमीटर

आंबोने: ४४० मिलिमीटर

डंगरवाडी: ४०७ मिलिमीटर

Mumbai News : अंधेरी सब वेवर 3 फुटांपर्यंत पाणी, वाहतूक पूर्णत: बंद

मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे तीन फुटापर्यंत भरले पाणी भरले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे दुसऱ्यांदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. वाहतूक पोलिसांकडून बॅरिगेट लावून सबवे वाहतुकीसाठी बंद केलाय. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय.

Mumbai Traffic Updates : पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. अशातच या पावसाचा परिणाम जो आहे तो रेल्वे वाहतुकी सोबतच रस्ते वाहतुकीवर देखील झाला आहे.बोरिवलीहून वांद्रे च्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

मालाड,जोगेश्वरी,गोरेगाव,अंधेरी विलेपार्ले आणि सांताक्रुज पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली असून यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास देखील उशीर होत आहे. सकाळची वेळ असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या कामावर पोहोचण्यासाठी लगबग करत आहे मात्र वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांना कामावर पोचण्यास विलंब होत आहे.

Pune News : माळीण परिसरात दरड कोसळली; अनेक गावांचा संपर्क तुटला

माळीणच्या बाजुच्या आसाणे जांभळेवाडी, कुंभेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डोंगरकडा कोसळल्याने रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी माळीण परिसरातील ८ ते १० गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या आठवडाभरापासून गावात लाईट नसल्याने आदिवासी बांधवांचे मोठे हाल होत आहे. पावसामुळे भातशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Ratnagiri News : रत्नागिरीत अतिमुसळधार पाऊस, जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी

रत्नागिरी - खेडच्या जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली

खेडमधील मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ

जगबुडी नदी सध्या 8.10 मीटरने वाहतेय

नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे खेडमधील सखल भागात शिरले पाणी

पावसाचं प्रमाण असच राहीलं तर पुन्हा एकदा खेड शहराला पुराचा बसू शकतो फटका

Kolhapur News : कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीला महापूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरातील तब्बल ८३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सद्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ४३.१ फुटांवर पोहचली आहे.

Nashik News : नाशिककरांचे पाणी कपातीचे संकट टळले, गंगापूर धरण 50 टक्के भरलं

- नाशिककरांचे पाणी कपातीचे संकट टळले

- नाशिकचे गंगापूर धरण 50 टक्के भरल्याने मोठा दिलासा

- तर दारणा धरण जवळपास 80 % भरल्याने 8000 क्युसेस पाण्याचा विसर्ग

- चार दिवस झालेल्या संततदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ

- पुढचे 48 तास जिल्ह्यात संततधार पावसाचा अंदाज..

Ahmednagar News : भंडारादरा धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, रंधा धबधब्याने धारण केले रौद्ररूप

अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि निळवंडे धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे.. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंधा धबधब्याने रौद्र रूप धारण केले असून धरणातील पाणीसाठा झापाट्याने वाढत आहे.. अकरा टिएमसी क्षमता असलेले भंडारदरा धरण जवळपास 75 टक्के भरलेय तर निळवंडे धरणही 30 टक्के भरल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं वयाच्या ८० व्या वर्षी निधन

फादर फ्रान्सिस दिब्रिटो (वसई धर्मप्रांत) यांचं दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. दिब्रिटो हे मूळचे जेलाडी, नंदाखाल, पवित्र आत्मा चर्च, नंदाखाल येथील होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज दुपारी ३.३० वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी (जेलाडी) त्यानंतर ४ वाजेपासून पवित्र आत्म्याचे चर्च, नंदाखाल येथे अंत्यदर्शन घेता येईल.

Raigad News : मावळमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, इंद्रायणी नदीकाठची अनेक मंदिरे पाण्याखाली...

मावळात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असल्याने संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहूतील इंद्रायणी नदी दुधळी वाहत आहे. नदी काठच्या बऱ्याचशा भागांमध्ये पाणी भरलेले आहे. नदी काठावर चार वारकरी शिक्षण संस्था आहेत त्यांच्या तळमजल्यात पाणी गेले आहे. त्यामध्ये गाडगे महाराज धर्मशाळा पित्ती धर्मशाळा, सतगुरू जंगली महाराज धर्मशाळा, यांचा समावेश आहे. मुख्य मंदिरा शेजारी असलेल्या धर्मशाळेचा तळमजला हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे.

Raigad News : रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर

रायगड अपडेट :

० रायगड जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये आज बंद राहणार

० रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

० सावित्री, कुंडलिका आणि अंबा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली

० ग्रामीण भागात पूरस्थिती गंभीर होण्याची भीती

Pune News : भिमाशंकर मार्गावर दरड कोसळली, वाहतुकीचा मोठा खोळंबा

भिमाशंकर राजगुरुनगर मार्गावर मोरोशी शिरगाव फाट्यावर दरड कोसळली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. बाजूलाच असणारा जनावरांचा गोठा थोडक्यात बचावला असून प्रशासनाकडून दरड काढण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्यामुळे राजगुरुनगर मार्गे भिमाशंकरला जाणारी वाहतुक बंद करण्यात आली आहे.

Mumbai Rain News : मुंबईसह पुण्यात मुसळधार पावसाने झोडपलं, अनेक भागात पूरस्थिती

मुंबईसह उपनगरात बुधवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे लोकल ट्रेनच्या वेळेवर मोठा परिणाम झाला असून तिन्ही मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुण्यातही मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड लोणावळ्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com