

महाराष्ट्रात पुढील ३ दिवस पावसाचे
महाराष्ट्रातील जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
पुणे, रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार सुरू आहे. तर काही ठिकाणी अधुनमधून पाऊस पडत आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे असणार असल्याचे सांगितले आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येणारे ३ दिवस पावसाचे असणार आहे. विदर्भासाठी आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भासह राज्यातील अनेक भागात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे.
पुण्यात जुलै महिन्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शनिवारनंतर पाऊस उघडीप घेणार आहे. राज्यात पुढील तीन दिवस काही भागात रेड तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अजुनही पावसाची प्रतीक्षा आहे. या भागातील शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, आज हवामान खात्याने पुणे आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज पुणे घाटमाथा, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर घाटमाथा, परभणी, हिंगोली आणि जालना येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, अहिल्यानगर, धाराशिव, संभाजीनगर, लातूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, भंडारा, वर्धा, नागपूर, अहिल्यानगर, वाशिम आणि यवतमाळमध्ये या जिल्हयांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.