खड्डेमुक्त रस्त्यांची मंत्र्यांकडूनच पोलखोल, गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खराब'

Roads in Maharashtra Are Worse Than Gujarat”: खड्डेमुक्त रस्त्यांच्या घोषणेची आता राज्यातील मंत्र्यानेच पोलखोल केलीय... संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी कसं खड्ड्याचं साम्राज्य पसरलयं... आणि मंत्र्यांनी सरकारलाच कसा घरचा आहेर दिलाय...पाहूयात या रिपोर्टमधून...
MAHARASHTRA ROADS WORSE THAN GUJARAT? HASAN MUSHRIF EXPOSES POTHOLE CRISIS
MAHARASHTRA ROADS WORSE THAN GUJARAT? HASAN MUSHRIF EXPOSES POTHOLE CRISISsaam tv
Published On

संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलयं. जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातात नागरिकांचा बळी जात आहे. जनतेचा आक्रोश असतानाच खुद्द मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खराब आहेत. याची लाज वाटते असं मोठं विधान वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी केलंय...तर दुसरीकडे खड्डेमुक्त रस्ते हा नागरिकांचा अधिकार असल्याचं सांगत भाजपचे मंत्री आशिष शेलारांनी थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच खड्ड्यासाठी जबाबदार धरलयं....

राज्यात महायुती सरकार सत्तेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री मुश्रीफांनी केलेल्या या विधानामुळे विरोधकांना आयती संधी मिळालीय़..., रस्त्यावर खड्डे आहेत की खड्यात महाराष्ट्र आहे हे सर्वांना माहित आहे, असं म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावलाय...

मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झालेत. नुसते शहरातील रस्ते नाहीत तर मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक या महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत. दरवेळी निवडणुकीत खड्डेमुक्त रस्त्यांची घोषणा लोकप्रतिनिधींकडून केली जाते...मात्र सत्ता येताच खड्डेमुक्त रस्त्याचा त्यांना विसर पडताना दिसतो... दरवर्षी येतो पावसाळा आणि त्याबरोबर पहायला मिळतो खड्ड्यांचा देखावा हे चित्र भविष्यात तरी बदलणार का? कॅबिनेट मंत्र्यानेच खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधल्यानं महायुती सरकार आता तरी ठोस भूमिका घेणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com