ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; ठाकरे गटाच्या प्रवक्त्याचा शिंदे गटात प्रवेश

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड झालीय. ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने पक्ष सोडलाय.
Uddhav Thackeray faction spokesperson Anand Dubey switches sides
Uddhav Thackeray faction spokesperson Anand Dubey switches sidessaam tv
Published On: 
Summary
  • आनंद दुबे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती.

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.

  • पक्षप्रवेशावेळी राहुल कनाल देखील उपस्थित

विकास काटे, साम प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजकारणात मोठा डाव टाकत उद्धव ठाकरेंचा बड्या नेत्याला फोडलाय. शिंदेंनी थेट ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांचा आपल्या पक्षात प्रवेश करून घेतलाय. आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत दुबे यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केलाय. दुबे यांच्या पक्ष प्रवेशावेळी राहुल कनाल देखील उपस्थित होते. हाती आलेल्या माहितीनुसार दुबे यांना शिंदे गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Uddhav Thackeray faction spokesperson Anand Dubey switches sides
Political News : शरद पवारांना मोठा धक्का! ३ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश

दुबे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशात अराजकता पसरवत आहेत. परंतु आमच्यासाठी देश प्रथम आहे. इंडिया आघाडीची सत्ता नसल्यानं ते वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे देशाच्या न्यायव्यवस्थेवर सुप्रीम कोर्टावर दबाव आणत असल्याचा आरोप शिंदेंनी केलाय.

दरम्यान आनंद दुबे यांनी दोन दिवसापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे गटाला रामराम ठोकला होता. राजीनामा देताना दुबे यांनी पक्षाच्या कारभारावर नाराजी वर्तुवली होती. एका वृतसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दुबे यांनी राजीनामा देण्याचं कारण सांगितलं होतं. आपल्याला कोणत्या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पार्टी लाइन दर्शवता येत नाहीये. पक्षानं आपला मार्ग बदललाय. ठाकरे गटासोबत काम करताना आपण खूप प्रामाणिकपणे काम केलं. परंतु आता पक्षाने भूमिका बदलल्याचं दिसतंय. त्यावेळी दुबे यांनी सीजेपीच्या आंदोलनावरून पक्षाच्या कारभारावर टीका केली होती.

Uddhav Thackeray faction spokesperson Anand Dubey switches sides
पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट; भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी आमनेसामने, कोणी-कोणी भरला अर्ज?

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची बाजू मांडणारे आनंद दुबे यांनी आपल्या निर्णयामागे हिंदुत्व आणि सनातन धर्म याबाबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण दिलं होतं. त्यांचे म्हणणे आहे की, पक्षाची विचारधारा आणि सार्वजनिक विधानांशी ताळमेळ साधणे त्यांच्यासाठी कठीण होत चालले होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हणाले होते. आनंद दुबे हे आदित्य ठाकरे यांच्या अगदी जवळचे मानले जात होते.

त्यांनी राष्ट्रीय पातळीवर कायम पक्षाची बाजू मांडत असतं. महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित मुद्द्यांसोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवरही ते पक्षाची भूमिका मांडत असायचे. मुंबईच्या राजकारणात हिंदी भाषिक नेत्यांच्या भूमिकेच्या दृष्टीनेही आनंद दुबे यांची ओळख होती. त्यांच्या उपस्थितीमुळे ते पक्षाच्या अशा चेहऱ्यांमध्ये सामील झाले होते, ज्यांना महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकही ओळखतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com