Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे कृतघ्न, मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आल्यानंतर मदत केली, पण; दिपक केसरकर स्पष्टचं बोलले

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे मतदार फक्त ४० ते ४५ हजार होती, मी आल्यानंतर ही संख्या दीड लाखांवर गेली. याची ठाकरेंना जाणीव नाही, असे दिपक केसरकर म्हणाले.
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray
Deepak Kesarkar On Uddhav ThackeraySaam tv
Published On

विनायक मंजिरे, प्रतिनिधी|ता. ६ फेब्रुवारी २०२४

Maharashtra Politics News:

नुकताच शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेंचा झंझावाती कोकण दौरा पार पडला. या दौऱ्यावेळी उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत शिंदे गट तसेच भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला होता. यावेळी सध्या शिंदे गटात असलेले मंत्री दिपक केसरकर आणि उदय सामंत यांना ठाकरेंनी लक्ष्य केले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यानंतर आता दिपक केसरकर यांनीही जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

काय म्हणाले दिपक केसरकर?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कृतघ्न आहेत आणि म्हणूनच 50 खोक्याचे आरोप आमच्यावर करत आहेत. त्यांनी या 50 खोक्यातील एक रुपया तरी दाखवून द्यावा. मी आजपर्यंत उद्धव साहेबांबद्दल सन्मानानेच बोललो आहे, यापुढेही बोलेन असे म्हणत याच उद्धव ठाकरे यांना मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो तेव्हा अनेक प्रकारची मदत केल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले.

ठाकरेंना सवाल...

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे (Shivsena) मतदार फक्त ४० ते ४५ हजार होती, मी आल्यानंतर ही संख्या दीड लाखांवर गेली. याची ठाकरेंना जाणीव नाही, असे म्हणत कोणी शिवसेनेला वर आणलं? असा सवालही दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उपस्थित केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray
Nandurbar News : कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी; दरातील फरकावरून शेतकऱ्याला केली मारहाण

शरद पवारांमुळे शब्द फिरवला...

"तुम्ही अडचणीत होता तेव्हा मी मोदींची गाठ घालून दिली. तुम्ही दिल्लीला गेल्यावर शब्द दिला अन् पवार साहेबांनी सांगितल्यावर शब्द फिरवला. महाराष्ट्राने असं नेतृत्व कधीच पाहिलं नव्हतं. मला गद्दार म्हणण्याचा अज्जिबात अधिकार नाही. जर आम्हाला गद्दार म्हणत राहणार असतील तर मग महाराष्ट्रात फिरून आम्हाला सुद्धा त्यांची जागा त्यांना दाखवून द्यावी लागेल," असा इशारा उद्धव ठाकरे यांना दिपक केसरकर यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray
Nandurbar News : कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची दादागिरी; दरातील फरकावरून शेतकऱ्याला केली मारहाण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com