'50 कोटींचं डील, 15 कोटी अ‍ॅडव्हान्स'; खासदारांना हमीभाव, संजय राऊतांचा आरोप

Sanjay Raut News : राज्यात 50 खोक्यांचा आरोप पुन्हा एकदा होऊ लागलाय... शिवसेनेत सलग दुसऱ्यांदा फुट पडल्यानंतर राऊतांनी फुटलेल्या खासदारांचे रेटकार्ड उघड केलयं... खासदारांच्या फुटीमागे नेमकं कोणतं कारण आहे? राऊतांनी बंडखोर खासदारांना कसं सुनावलंय.?.पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Sanjay Raut
Sanjay Raut NewsSaam tv
Published On

शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या तोंडावर पक्षात केवळ चार वर्षांत पुन्हा एकदा उभी फूट पडलीय...२०२२ मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या फुटीनंतर राज्यात 50 खोक्यांचा आरोप चांगलाच गाजला... त्यात आता पुन्हा एकदा ठाकरेसेनेच्या 6 खासदारांनी बंड केल्यानंतर 50 खोक्यांचा आरोप होऊ लागलाय....ऑपरेशन टायगरसाठी प्रत्येक खासदारासोबत 50 कोटींची डील झाल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केलाय...

Sanjay Raut
Telegram Banned : नीट परीक्षेच्या आधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेपर फुटीवर लगाम लागणार

दुसरीकडे राऊतांनी खासदारांच्या फुटीचा रेट जाहीर करताच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी तृणमूलमधील फूटीवेळी खासदारांना देण्यात आलेली ऑफर जाहीर केलीय...मोइत्रा नेमकं काय म्हणाल्या पाहा...

केवळ 15 कोटी रुपये? एवढ्या स्वस्तात का जात आहेत? आमच्याकडील लोकांना तर 4 कोटी रुपये आगाऊ आणि उर्वरित 36 महिन्यांसाठी दरमहा 1 कोटी मिळाल्याचे समजते. हा तर 'हनी प्लस मनी'चा प्रकार आहे'

महुआ मोइत्रा यांच्या या X पोस्टवर राऊतांनी काय उत्तर दिलं... पाहा....

महुआजी, प्रति खासदार किमान आधारभूत किंमत 50 कोटी निश्चित करण्यात आलीय. 15 कोटी केवळ उचल आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, हे लोक 50 हजारांच्याही लायकीचे नाही. केवळ ठाकरेसेना आणि TMCया ब्रँडमुळेच बाजारात त्यांची किंमत वाढली.

Sanjay Raut
कंडोम, पैसे, मसाज मशीन, मेकअप रुम...; नगरसेविकेच्या कार्यालयात चालायचा भलताच प्रकार, पोलिसांनी धाड टाकताच बिंग फुटलं

राऊत आणि महुआ मोइत्रा यांनी खासदारांच्या फुटीचं रेटकार्ड उघड केल्यानं बंडखोरीसाठी देशात सुरु असलेल्या आर्थिक व्यवहारांचं वास्तव समोर आलयं...

मुळात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं होतं. त्यात ठाकरेसेनेचे 9 खासदार निवडून आले होते...त्यामुळे 6 खासदार फुटणं, हा उद्धव ठाकरेंसोबतच संपूर्ण मविआलाच मोठा धक्का आहे...मात्र यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा खासदार खरेदीची आणि खोक्यांची चर्चा सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com