Santosh Deshmukh Case : धनजंय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक

Dhananjay Munde Devendra Fadnavis : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
Dhananjay Munde Devendra Fadnavis
Dhananjay Munde Devendra Fadnavis Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुंडे यांचे पीए सागर बंगल्यावर मुंडेंचा राजीनामा घेऊन गेले होते. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन धनजंय मुंडेंवर आरोप झाले होते. मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर गृहमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यायला हवा असे वक्त्य संभाजी ब्रिगेडद्वारे केले जात आहे.

'बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली. या हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. आरोपींवर कारवाई झाली नाही. मंत्री धनजंय मुंडे आणि राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी हे प्रकरण पद्धतीने हाताळताना दिसले. सरकारने मुंडेंवर कारवाई केली नाही. अत्यंत विकृत पद्धतीने आरोपीने मारहाण करुन सुद्धा जर सरकार काही करु शकत नसेल, तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे होता. पण राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा नैतिकतेनुसार राजीनामा दिला पाहिजे', असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता संतोष शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान धनजंय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर एक्सवर पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी वैद्यकीय कारणास्तव मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचे सांगितले. मुंडे यांनी पीए प्रशांत जोशीद्वारे मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे सोपवला. त्यानंतर मुंडेंनी एक्सवर पोस्ट शेअर करत संबंधित माहिती दिली.

Dhananjay Munde Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Case: दीड महिना फोटो का लपवले? पोलीसही कटात सहभागी; शरद पवार गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप

'बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे', असे मुंडे यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिलेले आहे.

Dhananjay Munde Devendra Fadnavis
Pankaja Munde: 'धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता', राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com