Santosh Deshmukh Case: दीड महिना फोटो का लपवले? पोलीसही कटात सहभागी; शरद पवार गटाच्या खासदाराचा गंभीर आरोप

MP Bajranga Sonwane On Deshmukh Viral Photo: पोलिसांकडे मारेकऱ्यांचे फोटो दीड महिन्यांपासून आहेत. परंतु त्यांनी राज्यातील लोकांना सागितलं नाही. ते का लपवून ठेवलेत असा सवाल खासदार सोनवणे यांनी केलाय.
MP Bajrang Sonwane
MP Bajrang Sonwane On Deshmukh Viral Photo
Published On

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करावी. सर्व दोषींना पैसे गाडी पुरवणारे सगळे, सगळ्यांना सह आरोपी करा. कुणाचा राजीनामा ही आमची मागणी नाही पण दोषी असेल तर सर्व दोषींवर कारवाई व्हावी. या मारेकऱ्यांना फाशी, आणि मदत करणाऱ्यांना शिक्षा, त्यांनाही अशाच पद्धतीने मारायला हवं, अशी मागणी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केलीय. मारेकऱ्याचे हे फोटो आतापर्यंत पोलिसांनी का लपवले, असा सवाल उपस्थित करत खासदार सोनवणे यांनी पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलंय.

खासदार सोनवणे हे मस्साजोग येथे आले असून त्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी माध्यम प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मारेकऱ्यांचे फोटोंवरून पोलीस यंत्रणेवर सवाल उपस्थित केले आणि पोलीसदेखील हत्येच्या कटात सहभागी होते असा गंभीर आरोप खासदार सोनवणे यांनी केलाय. सरपंच देशमुख हत्याप्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केलं असून यात वाल्मिक कराड याला मुख्य दोषी ठरवलं आहे.

सोमवारी सोशल मीडियावर देशमुख यांना मारहाण करण्यात येत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यात संतापाचा लाट उसळली. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेकडे राजीनाम्याची मागणी केली. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय. खासदार बजरंग सोनावणे यांनी प्रतिक्रिया दिलीय.

MP Bajrang Sonwane
Tanaji Sawant: तानाजी सावंतांसाठी 'सागर'चे गेट बंद; मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली?

त्या हरामखोराना, नीच माणसांना ज्यांनी हत्या केली. मग पोलीस असो वा कुणी त्यांना फाशी द्या, फोटो बघून हृदय पिळवून निघाले, अवघा महाराष्ट्र रडला. या क्रूर घटनेचा अंदाज आम्हाला होता आम्ही वारंवार म्हणत होतो. मास्तरमाईंड पुढं यायला हवा आम्हाला अंदाज होता, म्हणून मी बोलत होतो. सर्व दोषींना पैसे गाडी पुरवणारे सगळे, सगळ्यांनासह आरोपी करा. कुणाचा राजीनामा ही आमची मागणी नाही, पण दोषी असेल तर सर्व दोषींवर कारवाई व्हावी.

MP Bajrang Sonwane
Dhananjay Munde: सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला

माणूस पदावर असतो , त्याचा कुणी सहकारी अडकतो तर यंत्रणांवर दबाव असतोच, फक्त सगळ्यांवर कारवाई करावी ही अपेक्षा, असं खासदार सोनवणे म्हणाले. मनोज जरांगे लढताय, त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया योग्यच आहेत. खासदार म्हणून माझं एकाच म्हणणं आहे, या मारेकऱ्यांना फाशी, आणि मदत करणार्यांना शिक्षा, त्यांनाही अशाच पद्धतीने मारायला हवं असं खासदार सोनवणे म्हणाले.

पोलिसांवर गंभीर आरोप

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, पण हे फोटो पोलिसांजवळ अडीच महिन्यांपासून आहेत. पोलीस यंत्रणेचा यात सहभाग आहे, राज्याच्या जनतेला हे का आधी सांगितलं नाही? मुख्यमंत्र्यांना माहिती असेल ना मग लपवून का ठेवले. आमचं एकाच म्हणणं आहे दोषींवर कारवाई व्हावी. हे फोटो बघून काय वाटलं हे सांगू शकत नाही. मी निशब्द होतो. अंदाज होता हे क्रूर पने केलाय म्हणून पण फोटो पाहून हादरून गेलो.

हे फोटो आतापर्यंत का दडवले पोलिसांनी का लपवले,पोलीस या कटात सहभागी आहेत आमचा आरोप आहे. आमचेच माणसे वापरून आमच्याच विरोधात काही लोक आंदोलन करत होते. याला काय म्हणावे, दीड हजार कोटींची माया आहे, मीडियाने दाखवले सगळ्याची चौकशी व्हावी. असं खासदार सोनवणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com